लोकनेता न्यूज
ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर :-मागील सरकारने मला पद्मश्री
दिला तरीही मागील सरकारच्या काळात खूप त्रास झाला. हा त्रास सरकारने नव्हे, एका भाजप
मंत्र्याने मला त्रास दिला होता, त्यावेळी विरोधीपक्ष नेते असलेल्या धनंजय मुंडे यांचा
मोठा आधार मिळाला, त्यांच्यामुळेच मी सरकारी नोकरीत राहू
शकलो,’ असा गौप्यस्फोट ज्येष्ठ नेत्रतज्ज्ञ डॉ तात्याराव लहाने
यांनी केला.माझे सर्व पुण्य मी त्यांना देतो
, असेही लहाने म्हणाले.
नगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यात
वंजारवाडी येथील संत वामनभाऊ –संत भगवानबाबा प्रतिष्ठान यांच्यावतीने संत भगवानबाबा यांच्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित अखंड हरिनाम
सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये डॉ. लहाने यांना सामाजिक न्यायमंत्री
धनंजय मुंडे यांच्या हस्ते समाजभूषण पुरस्कार देण्यात आला. त्यावेळी सत्काराला
उत्तर देताना डॉ. लहाने बोलत होते.
मागील सरकारच्या काळात अधिष्ठाता असताना डॉ. लहाने
यांना अनेक अडचणी आणि सरकारच्या रोषाला सामोरे जावे लागले होते. त्यांच्याविरूद्ध
गुन्हाही दाखल झाला होता. यावेळी झालेल्या त्रासाची आठवण त्यांनी भाषणातून
सांगितली. तत्कालीन फडणवीस सरकारवर टीका करताना त्यांनी मुंडे यांचे मात्र कौतूक
केले.
डॉ. लहाने म्हणाले, ‘गेल्या सरकारच्या काळात मला काही अडचणी
आल्या. त्यावेळी मला मोठा त्रास सहन करावा लागला. मला त्या संकटातून सोडवण्यासाठी
मुंडे यांनी मोलाची मदत केली. सभागृहासह सर्व पातळ्यांवर माजी बाजू लावून धरली.
त्यांच्यामुळेच मी सरकारी नोकरीत राहू शकलो. निरपेक्ष प्रेम कसे करावे, आपल्या माणसांना कसे जपावे हे त्यांच्याकडून शकले पाहिजे. ते आता मंत्री
झालेत. मी सरकारी नोकर आहे, तरीही ते माझी आशिर्वाद खाली
वाकून घेतात, हे त्यांचे मोठी पण आहे. आम्ही दोघांनीही
सेवाव्रत स्वीकारलेले आहे. धनंजय मुंडे यांना मी लहानपणापासून ओळखतो. त्यांची
राजकीय व सामाजिक कारकीर्द प्रचंड मोठी होणार आहे. त्यासाठी माझ्या आयुष्यात
कमावलेले सर्व पुण्य धनंजय यांना मिळावे, अशी आपण प्रार्थना
करतो.’
0 टिप्पण्या