Ticker

6/Breaking/ticker-posts

काय भाऊ, कस चाललय ? गावाकडं कधी येताय?’ शहरी मतदाराची मनधरणी ..

 


कोरानाच्या काळात शहरी मंडळीला येऊ नका इकडे कडक लॉकडाऊन आहे . तुम्हाला शाळेतच राहावे लागेल असे म्हणणारे पुढारी आता शहरातील मंडळी गावाकडे कधी येणार?’ अशी विचारण करू लागले आहेत.

अनेक गावांमध्ये कोरोनाच्या भीतीने बाहेरील व्यक्तींना गाव बंदी करण्यात आली होती. ग्रामस्थांनी गावच्या वेशीवर गावातील लोक आळीपाळीने पहारा देत होतेगावात बाहेरील व्यक्तीला येऊ दिले जात नव्हते. त्यामुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला होता. पण तेच कार्यकर्ते आता शहरातील मतदारांना ताई, दादा, अक्का, भाऊ, कस काय  चाललय ? ... गावाकडं कधी येताय? अशी विनवणी करत आहेत

       ग्रामपंचायत मतदानाला गावाकडे  या , असे फोन शहरातील मतदारांना  गावाकडून येण्यास सुरुवात झाली  आहे . आता आम्ही गावाकडे आलो तर चलेल का असा प्रश्न  शहरवासीयांना विचारला  तर अहो, आमचा तुम्हाला गावाकडे  यायला विरोध नव्हताइतर काही मंडळींनी विरोध केला. शेवटी तुम्ही म्हणून गाव आहेअशी मनधरणी  ग्रामपंचायत निवडणुकीती उमेदवार करत  आहेमार्च महिन्यात कोरोनाचा  प्रादुर्भाव सुरु झाला. तेव्हा कोरोनाच्या भीतीने गावांमध्ये बाहेरील व्यक्तींना गाव बंदी करण्यात आली होतीआता ग्रामपंचायत निवडणुकांची रणधुमाळी  सुरु झाल्यामुळे  गाव पुढाऱ्यांना शहरी भागातील मतदारांची आठवण येत आहे

    ग्रामीण भागातील अनेक नागरीक रोजगारासाठी पुणे, औरंगाबाद, मुंबई या शहरात गेले आहे . अशा मतदारांना फोन करून, मेसेज करून निवडणुकीत मतदान करण्याचे आवाहन गावातील  उमेदवार करीत आहेत निवडणुकीत सर्वच स्थानिक उमेदवार उभे असतात. ग्रामपंचायत निवडणूक ही नेहमीच अटीतटीची होत होतीत्यामुळे  प्रत्येक मतदाराला विशेष महत्त्व असते. येत्या १५ जानेवारी होणाऱ्या ग्रामपंचायतच्या निवडणुकांसाठी  जोरदार तयारी उमेदवारांकडून केली जात आहे.  याकरिता आता शहरी मतदारांची मनधरणी सुरु आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या