Ticker

6/Breaking/ticker-posts

सॅमसंगच्या 'या' स्मार्टफोनवर ३३ हजारांचा डिस्काउंट..!

 

महागडा फोन स्वस्तात खरेदी करा

लोकनेता न्यूज

ऑनलाईन न्यूज नेटवर्क  

नवी दिल्लीः  ई-कॉमर्स वेबसाइट फ्लिपकार्टवर   मोबाइल बोनंजा सेल सुरू आहे. या दरम्यान बजेट पासून महागड्या स्मार्टफोन्सवर जबरदस्त डिस्काउंट दिला जात आहे. जर तुम्हाला नवीन स्मार्टफोन खरेदी करायचा असेल तर ही तुमच्यासाठी चांगली संधी आहे. सॅमसंगचा महागडा स्मार्टफोन Samsung Galaxy S20+ वर जबरदस्त डिस्काउंट मिळत आहे.

Mobile Bonanza Sale मध्ये स्मार्टफोन स्वस्तात खरेदी करण्याची संधी मिळणार आहे. सेल मध्ये Samsung Galaxy S20+ स्मार्टफोनवर ३३ हजार रुपयांचा फ्लॅट डिस्काउंट दिला जात आहे. यासोबतच अनेक ऑफर्स दिले जात आहेत. जाणून घ्या ऑफर्ससंबंधी.

Samsung Galaxy S20+ ला मोठ्या डिस्काउंटसोबत खरेदी करण्याची संधीः या फोनच्या ८ जीबी रॅम प्लस १२८ जीबी स्टोरेज व्हेरियंटची किंमत ८३ हजार रुपये आहे. परंतु, या फोनला ३३ हजार रुपयांच्या फ्लॅट डिस्काउंटसोबत ४९ हजार ९९९ रुपयांत खरेदी करता येऊ शकते. यासोबतच १६ हजार ५०० रुपयांपर्यंत एक्सचेंज ऑफर दिला जात आहे.

जर ग्राहकांना संपूर्ण एक्सचेंज व्हॅल्यू मिळणार असेल तर हा फोन ३३ हजार ४९९ रुपयांत खरेदी करता येऊ शकतो. अन्य ऑफर्समध्ये ICICI बँकेच्या क्रेडिट कार्डच्या पेमेंटवर १० टक्के ऑफ दिला जात आहे. फोनला नो कॉस्ट ईएमआय सोबत खरेदी करता येऊ शकतो. फ्लिपकार्ट अॅक्सिस बँक क्रेडिट कार्डवरून पेमें केल्यास ५ टक्के अनलिमिटेड कॅशबॅक दिला जात आहे.

Samsung Galaxy S20+ चे फीचर्सः यात ६.७ इंचाचा क्वॉड एचडी प्लस सुपर अमोलेड डिस्प्ले दिला आहे. याचे पिक्सल रिझॉल्यूशन 3200 x 1440 आहे. याचा रिफ्रेश रेट १२० हर्ट्ज आहे. हा फोन एक्सीनोस ९९० प्रोसेसर आणि ८ जीबी रॅम दिला आहे. यात १२८ जीबी इंटरनल स्टोरेज दिला आहे. ज्यात मायक्रोएसडी कार्डच्या मदतीने १ टीबीपर्यंत वाढवता येऊ शकते. हा फोन अँड्रॉयड १० वर काम करतो.

फोनमध्ये क्वॉड रियर कॅमेरा दिला आहे. याचा प्रायमरी सेन्सर ६४ मेगापिक्सलचा तर दुसरा सेन्सर १२ मेगापिक्सलचा दिला आहे. तिसरा १२ मेगापिक्सलचा तर चौथा व्हीजीए डेप्थ कॅमेरा दिला आहे. फोनमध्ये सेल्फीसाठी १० मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा दिला आहे. फोनला पॉवर देण्यासाठी यात ४५०० एमएएच क्षमतेची बॅटरी दिली आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या