Ticker

6/Breaking/ticker-posts

औरंगाबाद नामांतरावर उदयनराजे भोसले यांची रोखठोक भूमिका..

 

सातारा :- औरंगाबाद  शहराच्या नामांतराच्या मुद्यावरून शिवसेना काँग्रेस आणि भाजपमध्ये वाद पेटला आहे. आता या वादावर भाजपचे खासदार आणि छत्रपती घराण्याचे
 वंशज उदयनराजे भोसले यांनी. 'नामांतर करताना कोणाची मानहानी होऊन उद्रेक होणार नाही याची काळजी घ्या' अशी रोखठोक भूमिका मांडली.

साताऱ्यात पत्रकारांशी बोलत असताना उदयनराजे यांनी औरंगाबाद शहराच्या नामांतरावर आपली.  प्रतिक्रिया दिली. 'एखाद्या शहराचे नामांतर करायचे असेल तर प्रत्येकाने आपली सविस्तर भूमिका मांडली पाहिजे. पण  नामांतर करताना कोणाची मानहानी होऊन उद्रेक होणार नाही याचा प्रत्येकाने सविस्तर विचार करावा. शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज हे आमचे पूर्वज आहे. त्यांच्याबद्दल आदर आहे. त्यांचा इतिहास वाचावा. शिवाजी महाराज किंवा संभाजी महाराज हे केवळ महाराज होते म्हणून बघितलं नाही. तर त्याच्या कर्तबगारीमुळे आणि लोक हिताच्या निर्णयामुळे ओळखत होते' असं उदयनराजे म्हणाले.

अनेक ठिकाणी आपण पाहतो की जुन्या शहरांची नाव बदलण्यात आली आहे.  ज्याप्रमाणे बाँबे शहराचे मुंबई झालं त्याप्रमाणे पूर्वीपासून असलेले औरंगाबाद शहराचे नाव बदलायचे असेल तर लोकशाही नुसार लोक निर्णय घेतील, अशी भूमिका त्यांनी स्पष्ट केली आहे.

दरम्यान, दुसरीकडे शिवसेना आणि काँग्रेसमध्ये औरंगाबाद शहराच्या नामांतरावरून वाद सुरूच आहे. यावर आता जास्त चर्चा करण्याची गरज नाही, आमची भूमिका आम्ही स्पष्ट केली आहे. महाराजांच्या नावाला आमचा विरोध नाही, ते आमचे देखील श्रद्धास्थान आहे, मात्र यातून काही वातावरण निर्मिती होऊ नये, असं आवाहन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले आहे.

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या