Ticker

6/Breaking/ticker-posts

एकही बालक वंचित राहणार नाही - महापौर

 


नगर शहरात महापौर बाबासाहेब वाकळे यांच्या हस्ते पोलीओ लसीकरण 

लोकनेता न्यूज

 ऑनलाईन न्यूज नेटवर्क

 नगर : -  देशभरामध्ये आजपासून सुरू झालेल्या पोलिओ लसीकरण मोहिमेचा नगर शहरातील लसीकरणाचां शुभारंभ शहराचे महापौर बाबासाहेब वाकळे यांच्या हस्ते चि.स्वराज कोरडे या बाळाला प्रथम लस देऊन करण्यात आला. 

या वेळी बोलतांना महापौर वाकळे म्हणाले की ,  शहरातील एकही बालक लासिकरणापसून वंचित राहणार नाही .महापालिकेच्या वतीने सर्व अरोग्यकेंद्रात,महापालिकेच्या सर्व शाळांमध्ये,तसेच शहरामध्ये अनेक ठिकाणी 377 बूथ वर लसीकरण सुरू करण्यात आले आहे . 5 वर्षापर्यंतच्या मुलांना पोलिओचां डोस आज न चुकता आवश्य द्या कुणी ही या लसिकरणापासून वंचित राहू नका. आपले बालक आज जरी जन्मले असेल तरी त्याला डोस द्यावा तसेच,या पूर्वी जरी दिला नसेल तरी ही आज नक्की डोस द्यावा व आपले बाळ आजारी असेल तर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार डोस द्यावा. असे आवाहन त्यांनी केले .

या वेळी  निवासी उपजिल्हाधिकारी संदिप निचित ,महिला बालकल्याण सभापती लताताई शेळके, नगरसेवक विपुल शेटिया,महापालिकेचे आरोग्याधिकारी डॉ.अनिल बोरगे, डॉ चौरे, डॉ. बांगर, डॉ. श्रीमती चेलवा . उमेश साठे,शिवा आढाव आदी मान्यवर उपस्थित होते.

      

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या