Ticker

6/Breaking/ticker-posts

भरदिवसा भिषण दरोडा! साठ वर्षीय महिलेचा निर्घुन खून



संगमनेर : -  तालुक्यातील कवठे कमळेश्वर येथे आज भरदुपारी लुटीच्या उदेशाने दरोडेखोरांनी एका ६० वर्षीय वृद्ध महिलेचा खून केल्याची घटना घडल्याने खळबळ उडाली आहे .

याबाबत  अधिक माहिती अशी की ,कमळेश्‍वरमध्ये आज मंगळवारी भर दुपारी दिड ते दोन वाजण्याच्या सुमारास सदरचा धक्कादायक प्रकार घडला आहे. या गावच्या सुरुवातीलाच असलेल्या एका घरात सावित्राबाई मोगल शेळके ही 60 वर्षीय महिला एकटीच रहाते. घरातच तिचे छोटेखाली गोळ्या-बिस्किटांचे दुकान आहे. सदर महिलेला एकुलती एक मुलगी असून ती अंभोरे येथे दिलेली आहे. आज दुपारी दिड ते दोन वाजण्याच्या दरम्यान सदर महिला घरात एकटीच असल्याची संधी साधून दरोडेखोरंानी तिच्या घरात प्रवेश केला. यावेळी तिने प्रतिकार करीत आरडाओरड करु नये म्हणून दरोडेखोरांनी तिचा गळा दाबून तिच्या गळ्यातील सर्व दागीने व कानातले ओरबाडून घेतले. मात्र या प्रकारात श्‍वास गुदमरल्याने वृद्ध महिलेचा अंत झाला.

सदर प्रकार सुरु असतांनाच त्या वृद्धेच्या घरापासून काही अंतरावर राहणार्‍या एका कुटुंबातील चार वर्षीय बालिका खाऊ आणण्यासाठी त्या महिलेच्या दुकानात गेली. त्यावेळी तेथेच असलेल्या दरोडेखोरांची नजर त्या लहानशा मुलीच्या गळ्यातील सोन्याच्या डूलवर पडली आणि त्यांनी ते देखील ओरबाडले. त्यामुळे त्या चिमुकलीचा कान फाटल्याने ती रडतरडत तेथून पळतच आपल्या घरी परतली. तिची अवस्था पाहून तिच्या आई-वडिलांनी काय झाले म्हणून विचारले असता ती फक्त ‘आजी.. आजी..’ असं म्हणू लागल्याने त्या परिसरातील काहींनी त्या वृद्ध महिलेच्या घरी जावून पाहिले असता सदर महिला मृत होवून पडल्याचे त्यांना दिसले.

हा म्हणता ही वार्ता अवघ्या कौठे कमळेश्‍वर परिसराला समजल्याने गावकर्‍यांनी तेथे धाव घेत दरोडेखोरांचा माग काढण्यासाठी अख्खा परिसर पिंजून काढला. मात्र दरोडेखोरांचा कोठेही पत्ता लागला नाही. याबाबत तालुका पोलिसांना माहिती दिल्यानंतर संगमनेर उपविभागाचे पोलीस उपअधीक्षक राहुल मदने, तालुका पोलीस निरीक्षक पांडूरंग पवार, शहर पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख आदींसह तालुका व शहर पोलिसांनी कौठे कमळेश्‍वरकडे धाव घेतली. भरदुपारी दरोड्याच्या वृत्ताने पोलीस अधीक्षकही चक्रावल्याने त्यांनी तातडीने श्‍वान पथक रवाना करीत स्वतःही कौठे कमळेश्‍वर गाठले. सध्या घटनास्थळी वरीष्ठ अधिकार्‍यांसह स्थानिक गुन्हे शाखेचे पथकही उपस्थित असून या घटनेची प्रत्यक्षदर्शी असलेल्या त्या चार वर्षीय चिमुरडीला विश्‍वासात घेवून तिच्याकडून माहिती काढण्याचे प्रयत्न सुरु आहेत. या घटनेमुळे ग्रामीण भागात घबराट पसरली आहे !


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या