Ticker

6/Breaking/ticker-posts

कोरोंना लसीकरणा पूर्वी व नंतर दारू प्यावी की नाही ? तळीराम भांबावले..


मुंबई :- देशात लसीकरण मोहीम सुरु झाल्यानंतर सोशल मीडियावर विविध माहिती प्रसारित होत आहे. त्यातीलच एक म्हणजे लसीकरणाच्या आधी दोन महिने दारू पिऊ नका आणि लसीकरणानंतरही दोन महिने दारू पिऊ नये. यानंतर हा माहिती असणारा संदेश अनेक ठिकाणावरून विविध व्हॉट्सअॅप ग्रुप मध्ये दिवसभर फिरत होता. ह्या माहितीची सत्यता पडताळण्याचा प्रयत्न केला असता वैद्यकीय तज्ञांकडून असे लक्षात आले की लस घेण्याआधी काही दिवस आणि लस घेतल्यानंतर काही काळ दारूचे अति सेवन करू नये. त्यामुळे लस घेतल्यानंतर जी रोग प्रतिकारक शक्ती निर्माण होणे अपेक्षित असते त्यामध्ये बाधा येऊ शकते. याचा अर्थ विविध अंगाने काढला जाऊ शकतो तो म्हणजे जास्त घेऊ नका, आजिबात घेऊ नका किंवा कमी घ्या.

ज्या वेगात लसीकरणाला घेऊन मद्य घेता येणार येणार नाही अशी बातमी पसरली. त्यावेळी संबंध मद्यप्रेमींची तारांबळ उडाल्यासारखी अवस्था झाली होती. बरं हा विषय मद्यप्रेमी पुरता मर्यादित न राहता न घेणारे चवीने या विषयाची चर्चा करताना आढळत आहे. अनेक मद्यप्रेमीनी ग्रुप मध्ये ही माहिती खरी की खोटी याची शहानिशा केली. काहीनी त्याला हास्यसपद दाद देत मग लस नकोच, ही माहितीच खोटी आहे.

याप्रकरणी मुंबई शहराच्या कोरोना मृत्यू विश्लेषण समितीचे अध्यक्ष आणि केईएम रुग्णालयाचे माजी अधिष्ठाता डॉ अविनाश सुपे सांगतात, की, "या संदर्भात परदेशात काही पेपर सादर करण्यात आले आहे. यामध्ये दारू पिऊ म्हण्यापेक्षा अतिसेवन करू नये त्याचा असा कालावधी काही ठरवून दिलेला नाही. आधी काही काळ आणि नंतर काही काळात अति मद्यपान करू नये असे म्हटले आहे. अतिसेवनामुळे रोगप्रतिकारक शक्तीवर परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तर राज्य कोरोना विशेष कृती दलाचे सदस्य डॉ शशांक जोशी यांनी या माहितीला दुजोरा देताना लसीकरणाच्या आधीच्या मद्य सेवनाशी काही संबंध नाही मात्र लस घेतल्यानंतर मात्र अतिसेवन दारूचे करू नये किंवा काही काळ मद्य घेऊ नये कारण त्याचा थेट परिणाम अँटीबॉडीजवर होऊ शकतो.

वैद्यकीय तज्ञ कधीच नागरिकांनी मद्य सेवन करावे असा सल्ला देत नाहीत. मात्र चुकीची माहिती नागरिकांमध्ये जाऊ नये याकरता ही बातमी करण्यात येत आहे. शिवाय या अशा माहितीमुळे काही नागरिकांनी लस घेण्याचे टाळले तर समाजात धोके निर्माण होऊ शकतात.

इंडियन मेडिकल असोसिएशनचे माजी अध्यक्ष महाराष्ट्र, डॉ अविनाश भोंडवे यांच्या मते नियमित मद्य सेवन करतात त्यांची प्रतिकार शक्ती कमी असते. मात्र लसीकरण झाल्यानंतर त्यांनी मद्यपान केले तर अँटीबॉडीजवर परिणाम होतो,  असे संशोधन कुठे पाहण्यात आलेले नाही. त्यामुळे माझ्या माहितीप्रमाणे मद्य घेण्याचा आणि लसीच्या परिणामकारकतेशी काही संबंध आहे, असे वाटत नाही. लस सगळ्यांना देणे अपेक्षित आहे.

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या