Ticker

6/Breaking/ticker-posts

धनंजय मुंडेंबाबत राष्ट्रवादीचा मोठा निर्णय

 पक्ष राजीनामा घेणार नाही
 मुंबई : - गुरुवारी रात्री उशिरा राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांच्या निवासस्थानी राष्ट्रवादीच्या कोअर कमिटीची बैठक पार पडली यामध्ये     धनंजय मुंडे प्रकरणाावर विस्तााराने चर्चा होऊन त्यांचा राजीनामा घेणार नसल्याची भूमिका राष्ट्रवादीने घेतली आहेे .

पक्षाध्यक्ष् शरद पवार यांनी गुरुवारी दुपारी पक्ष म्हणून काहीतरी निर्णय घेण्याची गरज असल्याचे वक्तव्य केले होते . त्यानंतर पवारांनी पोलिस अधिकाऱ्यांची भेट घेऊन या प्रकरणाची सखोल माहिती घेतली . लगेच रात्री उशिरा कोअर कमिटीची बैठक बोलावली . बैठकीस पक्षाध्यक्ष शरद पवार , जयंत पाटील , सुप्रियाताई सुळे , अजित पवार उपस्थित होते .

बैठकीत संपूर्ण प्रकरणावर चर्चा झाली . यात मुंडे यांच्यावर आरोप करणारी महिला रेणू शर्मा ही इतर काही नेत्यांना ब्लॅकमेल करण्यासाठी संपर्क होती . भाजपसह का ही नेत्यांनी अशा प्रकारचे आरोप केले आहेत , त्यामुळे हा सर्व प्रकार संशयास्पद असल्याने राष्ट्रवादिने देखिल सावध भूमिका घेतली आहे . त्यामुळे तुर्तास मुंडे यांचा राजीनामा घेणार नसल्याचा निर्णय घेण्यात आला .

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या