Ticker

6/Breaking/ticker-posts

खा. सुजय विखे यांनी दिले पाथर्डी साठी ८६ लाख

     माजी नगराध्यक्ष अभय आव्हाड यांचे विशेष प्रयत्न

 
पाथर्डी :- पाथर्डी नगरपरिषदेचे मा. नगराध्यक्ष अभय आव्हाड यांच्या प्रयत्नातून खासदार डॉ. सुजय विखे यांच्या स्थानिक विकास निधीतून येथील फुलेनगर व भगवाननगर परिसरातील विकासकामांसाठी मोठ्या प्रमाणावर निधी मंजूर करण्यात आला आहे. यामध्ये पाथर्डी शहरातील माणिकदौंडी चौक ते धामणगाव रस्त्यावरील भगवाननगर रस्त्यापर्यंत कॉंक्रिटीकरण करण्यासाठी रु. २५ लाख व धामणगाव रस्त्यावरील पगारे वस्ती अंतर्गत पूल बांधण्यासाठी रु. २१ लाख मंजूर करण्यात आले. शहरातील शंकरनगर अंतर्गत रस्ते कॉंक्रिटीकरण व पेव्हिंग ब्लॉक बसविण्यासाठी रु. ३५ लाख तसेच फुलेनगर व भगवाननगर मधील अंतर्गत रस्त्यालगत पेव्हिंग ब्लॉक बसविण्यासाठी रु. ५ लाख आदी मिळून रु.८६ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. माणिकदौंडी चौक ते धामणगाव रस्ता गेल्या अनेक दिवसांपासून खराब झालेला होता. शहरातील नागरिक सकाळी आणि संध्याकाळी मोठ्या प्रमाणावर या रस्त्यावरून निसर्गरम्य वनदेव परिसरात फिरायला जातात तसेच धामणगाव वरून पुढे मढी ला देखील हा रस्ता जोडलेला असल्याने या मार्गावर मोठया प्रमाणात वाहतूक वाढलेली आहे. हा रस्ता मंजूर झाल्याने उपनगरातील नागरिकांसमवेत समस्त शहरातील नागरिक सुखावले आहेत. तसेच पेव्हिंग ब्लॉक च्या माध्यमातून फुलेनगर परिसरातील काँक्रीट रस्त्यांच्या सुशोभीकरणामध्ये भरच पडणार आहे. खासदारांनी तात्काळ प्रतिसाद देत सदर निधी मंजूर करत प्रशासनाला पत्र सुपूर्त केल्याने दोन्हीही ठिकाणच्या नागरिकांमधून समाधान व्यक्त करत सर्व नागरिकांनी आणि अभय आव्हाड यांनी खासदार सुजय विखे पाटील यांचे आभार मानले आहेत.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या