Ticker

6/Breaking/ticker-posts

जिल्हा बँक निवडणूक : चाचपणी सुरू

 



अहमदनगर :-जिल्हा सहकारी बँकेचे निवडणुकीचे पडघम वाजू लागले असून  भाजप , काँग्रेस , राष्ट्र्वादी आणि शिवसेना या पक्षांमध्ये संचालक पदाचे उमेदवाारीसाठी इन्छुकांनी गुडघ्याला बाशिंग बांधले आहेे . त्यासाठी चाचपणी करण्याचे काम सुरू झाले आहेे . 

दरम्यान, नगरचे खासदार सुजय विखे यांनी शनिवारी पत्रकारांशी बोलताना, 'भाजपचे पॅनेल वा आमचे स्वतंत्र पॅनेल असे दोन्ही पर्याय आमच्यासमोर आहेत व दोन्हीपैकी कोणत्याही पर्यायाच्या आधारावर बँकेत सत्ता आणण्याचे नियोजन आमचे आहे', असे आवर्जून स्पष्ट केले.  याच धर्तीवर कॉंग्रेस व राष्ट्रवादी अन् सेनेकडूनही
वरिष्ठ नेतृत्वाशी चर्चा केली जाईल .  असाच पर्याय त्यांच्यापुढेही आहे . विशेषत : कॉंग्रेस व राष्ट्रवादी एकत्र लढतात की स्वतंत्र हे पाहणे महत्वाचे आहे . 
प्रथमदशर्नी  भाजप विरुद्ध दोन्ही कॉंग्रेस अन् सेना असे चित्र असले तरी प्रत्यक्षात ऐनवेळी तिला विखे विरुद्ध बाकी सर्व असे स्वरूप येण्याचीच शक्यता अधिक आहे. कारण जिल्हयातील सहकार व त्यावर वर्चस्व असलेली मातब्बर मंडळीं पाहता अंतिम टप्पात  जिल्हा बँकेची निवडणूक ही विखे -थोरात अशी सरळ -सरळ दोन गटात लढली गेल्याचा ईतिहास आहे . काही वेळा सहमती सुद्धा झाली परंतु तेवढा एक -दोन वेळेसचा अपवाद सोडला तर बहूतांश वेळा बँकेत विखे विरुद्ध अन्य सर्व असेच राजकारण झाले आहे . त्याची पुनरावृत्ती या वेळेलाही होऊ शकते .

बॅंकेच्या निवडणुकीत भाजप विरुद्ध आघाडी अशी लढत होईल का ? या तर्काला फारसा अर्थ उरत नाही . दोन्ही पक्षांच्या स्थानिक नेत्यांकडून आप आपल्या पक्षातील वरिष्ठांशी चर्चा बैठकांचा फार्स पार पाडला जाईल . वरिष्ठांकडूनही स्थानिक गट -तट विचारात घेतले जातील . शेवटच्या क्षणापर्यंत कोणतेही स्पष्ट धोरण अंगिकारले जाणार नाही . जेवढी संभ्रमावस्था वाढेल तेवढं सोईच्या राजकारणासाठी सेफ झोन तयार होईल . स्थानिक नेते मंडळींनाही  'सोधा' राजकारणासाठी ते पुरक ठरेल . त्यामुळे निवडणूकीत अधिकच रंग भरला जाईल . पडद्यामागे अनेक घडामोडी घडून नव -नवी समीकरणं उदयाला येतील .या वातावरणात राजकारण नेहमीप्रमाणे नाट्यमय वळणं घेऊन हा क्लायमॅक्च जिल्हा बँकेच्या पटावर झळकेल. तुर्त चाचपणी करण्याचे काम सुरू आहे . उमेदवारी अर्जे दाखल करण्यास सुरुवात झाली आहे . बराच अवधी असल्याने काय काय घडते याचि उत्सूकता निर्माण झाली आहे .

 



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या