* आदर्श हिवरे बाजार मध्ये तब्बल ३० वर्षांनी मतदान *
*दोन्ही आदर्श गावात होणार यंदा निवडणूक*
नगर : - ज्येष्ठ समाजसेवक आण्णासाहेब हजारे यांचे पारनेर तालुक्यातील राळेगण सिद्धी व पद्मश्री पोपटराव पवार यांचं नगर तालुक्यातील आदर्श गांव हिवरे बाजारला सत्तापिपासू मेनकेची दृष्ट लागली असून या दोन्ही ठिकाणी यंदा अनेक वर्षानंतर प्रथम य निवडणूक होणार आहे . त्यामुळे आदर्शाची पार ऐसी तैसी झाली आहे
हिवरे बाजार ग्रामपंचायतीत ३० वर्षानंतर निवडणुक होणार असल्याचे आज स्पष्ट झाले आहे. गावातील काही मंडळींनी एकत्र येऊन परिवर्तन ग्रामविकास पॕनल निवडणुकीत उतरवले आहे. दरम्यान आज अर्ज माघारी घेण्याची मुदत संपल्यानंतर परिवर्तनाच्या उमेदवारांनी पोलिस अधीक्षक कार्यालयात जाऊन निवडणूक प्रचारा दरम्यान जिवितास धोका असल्याने पोलिस संरक्षण मिळण्याची मागणी केली. बिनविरोध निवडणुकीस प्रतिसाद न दिल्याने सत्ताधा-यांकडुन दहशत होत असल्याचा केला आरोप परिवर्तनाच्या उमेदवारांनी केला आहे.
सन १९८५ मधे या आधी निवडणुक झाली होती तर १९८९ नंतर आत्तापर्यंत सलग सहा वेळा ग्रामपंचायत बिनविरोध झाली आहे आता ३० वर्षाने ग्रामस्थांना मतदान करावे लागणार आहे.
स्पेशल टॉक-
दरम्यान युवकांच्या वाढत्या राजकीय इच्छा -आकांक्षांपुढे या दोन समाजसेवक महर्षिना हतबल झाल्याची जाणीव झाली आहे . यामागे झारीतील शुक्राचार्य वेगळेच आहेत हा खरा गांव गुंडीचा भाग ... मात्र सत्य काय ते लवक स्च बाहेर येईल , तो पर्यंत सर्वांनी वाट पह्ववी एवढेच .
0 टिप्पण्या