Ticker

6/Breaking/ticker-posts

साईबाबांच्या शिर्डीत पासेसचा धंदा तेजीत ; २०० रुपयाचा पास..तब्बल ५ ते १० हजारावर ..!

 

शिर्डी :-लॉक डाऊन नंतर  आठ महिन्यांनी  शासनाच्या आदेशानुसार साईमंदिर भाविकांना दर्शनासाठी खुले  करण्यात आले . मात्र साई संस्थानने नियोजन करताना अनेक त्रुटी राहिल्याने  शिर्डीत सशुल्क पासेसच्या धोरणाचा  पुरता बोजवारा उडाला आहे.  पासेसचा  आता धंदा होऊ लागला असून अवघ्या २०० रूपयांचा पास काळ्या बाजारात तब्बल ते १० हजारला विकू लागला आहे.  यावर नियंत्रण ठेवण्याचे मोठे आव्हान साई संस्थान  पोलीस खात्यासमोर उभे ठाकले  आहे.

ऑनलाईन दर्शन आरती पासेस मिळण्याची सुविधा सक्ती साई संस्थानने केली असली तरी अनेकवेळा तांत्रिक अडचणीमुळे ही व्यवस्था कोलमडली जाते. मात्र त्याला पर्यायी व्यवस्था नाही. निशुल्क पासेस घेण्यासाठी भाविकांची दोन ते तीन किलोमीटर रांग गर्दीच्या दिवशी असते. त्यामुळे अनेक भाविक एजंट ( पॉलिशवाले ) यांच्या जाळ्यात अलगद अडकतात. दोनशे रुपयांचा पास चक्क पाच ते दहा हजार रुपयांना विकला जातोय.  त्यामुळे या पासेसचा धंद्यात अनेक गुन्हेगारी टोळ्या सक्रिय झाल्या असून हे तरुण साई संस्थांनच्या परिसरात गेट नं. बायोमेट्रिक पास काउंटर परिसर, बसस्टँड, द्वारकामाई , भक्तनिवास , पाचशे रूम्स, साई आश्रम याठिकाणी फिल्डिंग लावून पासेस घेतात तेच पास अव्वाच्या सव्वा भावात विकत आहेत. यात काही प्रमाणात सुरक्षारक्षक पासेस काउंटर वरील कर्मचाऱ्यांच्या हलगर्जीपणा मिलीभगत करणीभूत ठरत आहे.

शिर्डी पोलिसांचा व्यस्त दिनक्रम संस्थांची नसलेली पुरेशी व्यवस्था  त्याचाच गैरफायदा ह्या टोळ्या घेत असून त्यांचा सर्रास वावर मंदिर परिसर वरील ठिकाणी वाढतच आहे. तत्कालीन पोलीस उपअधीक्षक  सोमनाथ वाघचौरे यांनी यावर अंकुश ठेवत पायबंद घातला होता. त्यानंतर या व्यवसायात अनेक गुन्हेगारी प्रवृत्तीचे तरुण असल्याने शिर्डीत भाविकांच्या सुरक्षेवर पुन्हा प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे . मंदिर परिसरात संस्थान सुरक्षारक्षक  पोलिसांच्या डोळ्यादेखत घडत असलेल्या या गंभीर घटनेची  तक्रार पोलिस  अधीक्षक मनोज पाटील यांच्याकडे करणार अशी मत प्रथम नगराध्यक्ष कैलासबापू कोते यांनी मांडले.  यावर वेळीच  पायबंद घातला  नाही तर शिर्डी  हे गुन्हेगारीचे लुटमारीच ठिकाण व्हायला वेळ लागणार नाही. अशी  संतप्त भावना शिर्डी ग्रामस्थांनी व्यक्त केली

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या