Ticker

6/Breaking/ticker-posts

‘दो गज की दूरी’ दूर करण्यात रुग्णवाहिका चालकांचा मोलाचा वाटा - अक्षय कर्डिले

 

    
लोकनेता न्यूज

 ऑनलाईन न्यूज नेटवर्क 

नगर :आठ महिन्यांत लॉकडाऊनकोरोना रुग्णांची वाढती संख्यामाणसांपासून माणसे दूर जाताना हरवलेली माणुसकी अशी भयावह परिस्थिती असतांना माणसाचे जीव वाचवणारे डॉक्टर्सआरोग्य कर्मचार्यांसह ‘दो गज की दूरी’ दूर करण्याचे काम रुग्णवाहिका चालकांनी देखील केल्याने कोरोना योद्धा म्हणून त्यांचा सन्मान योग्यच आहेअसे प्रतिपादन युवा नेते अक्षय कर्डिले यांनी केले.

     सावेडी उपनगरातील संदेशनगरमध्ये साई संघर्ष सामाजिक प्रतिष्ठानच्यावतीने बीव्हीजी 108 रुग्णवाहिकांचे चालक त्यामधील डॉक्टर्स अशा 51 जणांना कोरोना योद्धा पुरस्कार देऊन श्री.कर्डिले यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आलेयाप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमास नगरसेवक सुनिल त्र्यंबकेनगरसेविका शितल जगतापप्रतिष्ठानचे अध्यक्ष योगेश पिंपळेमाजी नगरसेवक निखिल वारेबाळासाहेब पवारझिशान शेखवैभव  पोकळेधिरज उर्कीडेप्रदीप राऊतबबलू सुर्यवंशीअमित गाडेप्रताप गायकवाड आदि उपस्थित होते.

     श्री.कर्डिले पुढे म्हणालेकोरोनामुळे संकटात एकमेकांना कशी मदत करायचीकोरोना रुग्णाला कसा आधार द्यायचालॉकडाऊनमुळे उपासमारी दूर करण्यासाठी हजारो हात पुढे आलेअन्नदानाबरोबरच सेवा करणारे असंख्ये हात पुढे सरसावलेमहामारीत सुरवातीला रुग्णवाहिका आली कीरुग्णाला पहिला स्पर्श होत होतातो चालकाचा त्याला गाडीत घेऊन जाण्याचे काम या चालकांनी केलेडॉक्टर्सआरोग्य कर्मचार्यांसह या चालकांचा या कार्यात मोलाचा वाटा असल्याने त्यांना प्रतिष्ठानाने दिलेला सन्मान योग्यच असल्याचे यावेळी अक्षय कर्डिले यांनी स्पष्ट केले.

    नगरसेवक सुनित त्र्यंबके यावेळी म्हणाले कीसाई बाबांच्या कृपेने आम्ही प्रतिष्ठानच्या माध्यमातून नगरसेवक म्हणून असलेली जबाबदारी पार पाडतांनाप्रत्येक रुग्णांशी माणुसकीचे नातं जोपासत अर्सेनिक अल्बम गोळ्या वाटप केल्यामास्कसॅनिटायझरचे वाटप केलेअन्नदान करुन माणुसकी जोपासली हे सर्व साईंनी करुन घेतलेयाचे समाधान वाटते.
प्रतिष्ठानचे अध्यक्ष योगेश पिंपळे म्हणालेचांगल्या कामाचा  काम करणार्या सर्वांंच्या कार्यास प्रोत्साहन  प्रेरणा मिळण्यासाठी गौरव केलायामध्ये सफाई कामगारआरोग्य कर्मचारी यांचा सन्मान केलामग रुग्णवाहिका चालकडॉक्टर्स यांना देखील कोरोना योद्धा पुरस्कार दिल्याने त्यांचे मनोबल वाढेलअसे सांगितले.

     यावेळी साई मंदिरात शेवटचा गुरुवार  पौर्णिमेचे औचित्य साधून एक शाम साई के नाम कार्यक्रमातून श्रीकांत गडकरीपुजा गडकरीगौरव राऊत यांनी भक्तीगीते सादर केली.  यावेळी राहुल पाटोळे यांनी मंदिरास एक मोठी साईंची प्रतिमा भेट दिली.महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता झाली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या