Ticker

6/Breaking/ticker-posts

व्हीआरडीई : आ. नीलेश लंके यांचा इशारा

                                          नगर :-

देशाची फाळणी झाली त्यावेळी सध्या पाकिस्तानात असलेल्या रावळपिंडीजवळील  चखलाला प्रांतातून व्हिआरडीईचे नगरमध्ये स्स्थलांतर करण्यात आले होते. माझ्या नगर जिल्हयासाठी देशाच्या स्वातंत्र्यानंतरची ती आठवण आहे. सध्या ही संस्था नगर येथून चेन्नई येथे हालविण्याच्या हालचाली सुरू असून त्यास आपला ठाम विरोध आहे. यासंदर्भात आपण राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेउन निवेदन सादर केले असून खा. पवार यांनी दिलेल्या अश्‍वासनाप्रमाणे लवरकच संरक्षण मंत्र्यांची भेट घेण्यात येणार असल्याचे आमदार नीलेश लंके यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

देशाच्या स्वातंत्र्यानंतर नगर येथे स्थापन झालेल्या या संस्थेच्या देशभरात सध्या ५२ शाखा आहेत. या संस्थेने आजवर देशासाठी अनेक उपयुक्त संशोधने केलेली असून नगरच्या संस्थेची देशासह जगभरात वेगळी ओळख निर्माण झालेली आहे. संरक्षण विभागासाठी आवष्यक असलेली वाहने तसेच अन्य सामग्रीही विकसित करण्यात नगरच्या व्हिआरडीईचा मोलाचा  वाटा आहे. वाहनांची तपासणी करून त्यांना प्रमाणपत्र देण्याचा विशेष ट्रॅक नगरच्या व्हिआरडीई येथे उपलब्ध आहे. सर्वच अंगांनी नगरच्या संस्थेचे काम उजवे असल्याने ही संस्था हालविण्यामागचे कारण काय असा सवाल करून आ. लंके यांनी ही संस्था इतरत्र हालविण्यास आपला ठाम विरोध असल्याचे त्यांनी सांगितले.

  या संस्थेसाठी नगर जिल्हा तसेच परिसरातील शास्त्रज्ञांनी, कर्मचा-यांनी आजवर मोलाचे योगदान दिले आहे. आजही या संस्थेमध्ये सुमारे एक हजार लोक काम करीत असून त्यांच्या कुटूंबांचा उदरनिर्वाह त्यावर अवलंबून आहे. एक हजार पैकी दिडशे, दोनशे कर्मचारी परराज्यातील असले तरी तेही नगर येथेच स्थायीक झालेले आहेत. देशाच्या संरक्षण विभागात या संस्थेचे महत्वपूर्ण स्थान  असून शहर व परिसराच्या विकासात या संस्थेचे मोठे योगदान आहे. लष्कराचा महत्वपूर्ण मोठा तळ नगरमध्ये आहे. त्यासाठी ही संस्था नगर येथेचे असणे व्यवहारीकदृष्टया योग्य आहे. त्यामुळेच खा. शरद पवार यांच्या माध्यमातून या प्रश्‍नी आपण पाठपुरावा करणार आहोत. कोणत्याही परिस्थितीत ही संस्था येथून हालवू देणार नाही अशी ग्वाही आ. लंके यांनी दिली.
 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या