Ticker

6/Breaking/ticker-posts

पाथर्डी वीज वितरण कंपनीच्या कार्यालयावर उद्या दंडुके मोर्चा–अमोल गर्जे

 


लोकनेता न्यूज  ऑनलाईन

पाथर्डी:- वीज वितरण कंपनीकडून कोरोना काळातील थकबाकीसाठी पाथर्डी तालुक्यात व शहरात पठाणी पद्धीतीने वसुली वीज ग्राहकांकडून सुरु केली आहे.त्याविरोधात नागरिकांमधून संताप व्यक्त होत आहे. या प्रश्नासंदर्भात शुक्रवारी सकाळी वीज वितरण कंपनीच्या कार्यालयावर दंडुके मोर्चा काढणार असल्याचा इशारा भाजपा युवा मोर्चाचे अमोल गर्जे  दिला आहे.

          शासनाने एकीकडे कोरोना काळातील वीज बिलात सवलत देण्याची घोषणा केली. मात्र  वीज महामंडळाकडून शेतकऱ्यांच्या शेतीपंपाची व घरगुती ग्राहकांची वीज खंडित करून नागरिकांना वेठीस धरले जात आहे. वीज महामंडळाच्या कारवाई विरोधात तालुक्यातील विविध संघटनांनी आंदोलनाचा पवित्रा घेत शासनाचा आदेश नसतानाही वीज खंडित करणाऱ्या अधिकाऱ्यांविरोधात कारवाई करण्याची मागणी केली आहे.

          वीज वसुली बाबत वीज वितरण कंपनीने सक्तीची वसुली तालुक्यात आणि शहरात चालू केली आहे.कोरोना काळात सर्व उद्योग धंद्याची वाट लागली आहे.हातावर काम करणाऱ्या लोकांचे काम गेले आहे.अनेकांच्या नोकऱ्या सुद्धा हातातून गेलेल्या आहेत.शेतकरी उद्धवस्त झाला असून तो मेटाकुटीस आला आहे. अशा सक्तीच्या वीज वसुलीने अनेकांना आर्थिक झळ बसून त्यांचे आर्थिक गणिते बिघडतील त्यामुळे सरकारने यावर मार्ग काढावा अन्यथा वीज वितरण कंपनीच्या विरोधात दंडुके मोर्च्या आज ( २९ ) शुक्रवार रोजी काढणार आहे. तरी नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे ,असे आवाहन अमोल गर्जे यांनी केले आहे. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या