Ticker

6/Breaking/ticker-posts

संत भगवान बाबांची पुण्यतिथी साधेपणाने साजरी

 

लोकनेता न्यूज

ऑनलाईन न्यूज नेटवर्क  

हजारो भावीकांनी घेतले समाधी दर्शन 

  महाप्रसादाचे पगंती ऐवजी दर्शन                 बारीतच  वाटप 

 श्री क्षेत्र भगवान :- श्री क्षेत्र भगवान गडावर संत भगवान बाबाची ५६ पुण्यतिथी यावर्षी साधेपणाने साजरी करण्यात आली दर्शन बारीत सोशल अंतर  ठेवत भावीकांनी संत भगवान बाबांच्याच्या समाधीचे  दर्शन घेतले पुण्यतिथी निमित्त   महाप्रसादाचे वाटप  पगंती ऐवजी दर्शन बारीतच करण्यात आले. 

      भाविकानी भगवानगडावर न येता आपल्या आपल्या गावातच संत भगवान बाबाची पुण्यतिथी साजरी करावी कोरोनो विषाणु च्या साथरोगामुळे दक्षता म्हणुन श्री क्षेत्र भगवान गडावर  संत भगवान बाबाची  पुण्यतिथी या वर्षी भाविकाच्या अनुउपस्थिती मध्ये   अत्यंत साध्यापणाने साजरी करण्यात येणार असल्याचे श्री क्षेत्र भगवानगडाचे महंत डॉ नामदेव शास्त्री यांनी जाहीर केले होते. त्याप्रमाणे आज गडावर सकाळी ज्ञानेश्वरी विद्यापिठाचे आचार्य नारायण स्वामी यांच्या हस्ते समाधी पुजन झाले व भावीकाना दर्शनासाठी भगवान बाबा समाधी मंदीर खुले झाले.  दरवर्षी प्रमाणे या वर्षी पुण्यतिथीनिमित्य किर्तन झाले नाही तसेच महाप्रसादाच्या पगंती झाल्या नाहीत तसेच समाधी मंदीर सोडता इतर ठिकाणी भावीकाना   प्रवेश देण्यात आला  नाही. 

          बाबांच्याच्या  समाधी दर्शनासाठी  महाराष्ट्र व देशाच्या कानाकोपऱ्यातील भाविक येत असतात पुण्यतिथी दिवशी किर्तन व महाप्रसादासाठी भावीकाची गर्दी होते . चालु वर्षी  कोरोनो विषाणु मुळे होणाऱ्या कोरोना बाधीत रूग्णाचा  वेग मदांवला असला तरी पुर्ण पणे खंड झाला नसल्याने  कोरोना साथरोगाच्या पार्श्वभूमीवर  संत भगवान बाबाच्या पुण्यतिथी निमित्य  श्रीक्षेत्र भगवानगडा   पुण्यतिथीचा कार्यक्रम साधेपणा साजरा झाला

गडावर आलेल्या भावीक महाद्वारातुन प्रवेश केल्यानतंर विठ्ठल मंदीर व समाधी मंदीरात दर्शन घेऊन पुन्हा महादवारातुन बाहेर येत असल्याने कोठेही गर्दी झाली नाही दर्शन झालेल्या भावीकाना दर्शन घेऊन बाहेर येणाऱ्या बारीतच कागदामध्ये बुंदी व चिवड्याचा महाप्रसाद देण्यात आला पुण्यतिथी साधेपणाने साजरी होणार असल्याचे माहीत असुण ही उसतोडणी साठी गेलेला उसतोड कामगार बाबाच्या दर्शनासाठी गडावर दाखल झाला होते.

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या