Ticker

6/Breaking/ticker-posts

ओबीसींची जनगणना करा - भाजप नेत्या पंकजा मुंडे

 

मुंबई: भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी स्व. गोपीनाथ मुंडेचा ओबीसी जनगणनेच्या मागणीचा एक व्हिडीओ शेअर करत ओबीसींची जनगणना व्हावी अशी केंद्र सरकारकडे मागणी केली आहे. या संबंधी हिंदीमध्ये दोन ट्वीट करत पंकजा मुंडे यांनी ही मागणी केली आहे.

            पंकजा मुंडे आपल्या ट्वीटमध्ये म्हणाल्या की, ‘आम्हीही या देशाचे नागरिक आहोत, आमचीही गणना करा. ओबीसी जनगणनेची आवश्यकता आणि अपरिहार्यता आहे. असे म्हणत त्यांनी केंद्रातील आपल्याच सरकारला ओबीसी जनगणनेची आठवण करुन दिली आहे.

            पंकजा मुंडे यांनी आपल्या दुसऱ्या ट्वीटमध्ये म्हटलंय की, "2021 ची जनगणना जातीनिहाय होणं आवश्यक आहे. गावागावातून उमटलेला आवाज हा राजधानीपर्यंत जरुर पोहचेल यात शंका नाही." हे ट्वीट करताना पंकजा मुंडे यांनी स्व. गोपीनाथ मुंडेंचा एक जुना व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ 2010 सालचा आहे. त्यावेळी संसदेत बोलताना भाजप नेते स्व. गोपीनाथ मुंडे म्हणाले होते की, "आम्हीही या देशाचे नागरिक आहोत. आमची एवढीच मागणी आहे की ओबीसींची आणि एसटी, एससी लोकसंख्येची जनगणना करावी. अन्यथा सरकारला या लोकांच्या रोषाला सामोरं जावं लागेल."

विशेष म्हणजे भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी हे दोन्ही ट्वीट हिंदीतून केले आहेत. त्यामध्ये 'कुछ यादे और कुछ वादे' असे म्हणत त्यांनी केंद्रातील आपल्याच सरकारला ओबीसी जनगणनेची आठवण करुन दिल्याचं सांगण्यात येतंय. येणारी 2021 सालची जनगणना ही जातीनिहाय करण्यात यावी अशी मागणी त्यांनी केली आहे. गेल्या काही वर्षापासून ओबीसी जनगणनेची मागणी विविध पक्षांकडून करण्यात येतीय. त्यामुळे या विषयावर केंद्राला  विचार करावा लागणार आहे.

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या