Ticker

6/Breaking/ticker-posts

नातू, सून, मुलानेच आईला गंडवलं; लाखो रुपयांसह 150 तोळे सोने लंपास

 


बनावट कागदपत्रं बनवून नातू
, सून, मुलानेच आईला गंडवलं

लाखो रुपयांसह 150 तोळे सोने लंपास

लोकनेता न्यूज

ऑनलाईन न्यूज नेटवर्क  

 सोलापुर:- स्वत: चा मुलगा, नातू आणि सुनांनी बनावट कागदपत्रे तयार करून लाखोंची फसवणूक केल्याची तक्रार वृद्ध महिलेने केलीय. सोलापुरातील सैफुल परिसरात राहणाऱ्या भंगरेवा महादेव बागदुरे या वृद्ध महिलेच्या फिर्यादवरून विजापूर नाका पोलीस ठाण्यात यासंदर्भात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी मुलगा राजशेखर बागदुरे, नातू राकेश बागदुरे तसेच सूना राजश्री बागदुरे, शारदा बागदुरे यांच्यासह अन्य दोघांविरोधात या प्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या