Ticker

6/Breaking/ticker-posts

पुण्यातील कॉलेज 11 जानेवारीपासून सुरू, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा निर्णय

 


पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अंतर्गत येणारी महाविद्यालयं 11 जानेवारीपासून सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण देणारी सर्व महाविद्यालयं सुरु करण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अंतर्गत पुणे, नाशिक आणि अहमदनगर या तीन जिल्ह्यातील महाविद्यालयांचा समावेश होतो. ही महाविद्यालयं सुरु करताना कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना कराव्या लागणार आहेत. महाविद्यालयं कधी सुरू करायची याचा निर्णय घेण्यासाठी विद्यापीठाकडून एक समिती गठीत करण्यात आली होती. या समितीन हिरवा कंदील दाखवल्यानंतर महाविद्यालयं सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या