लोकनेता न्यूज
( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )
राहुरी : श्रीरामपूरचे माजी आमदार भानुदास मुरकुटे यांच्या विरोधात राहुरी पोलीस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला असून रात्री त्यांना अटक करण्यात आली आहे. या घटनेमुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.
पाथरे येथील पिडीत महिलेने मुरकुटे यांच्या विरोधात फिर्याद दाखल केली माजी आमदार भानुदास मुरकुटे यांनी
सन 2019 ते 2023 दरम्यान वेळोवेळी नगर जिल्ह्यातल्या वेगवेगळ्या ठिकाणी, मुंबई तसेच दिल्ली येथे लैंगिक अत्याचार केल्याबाबत तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
दरम्यान राहुरी पोलीस स्टेशनमध्ये याबाबत भारतीय दंड विधान संहिता कलम 376, 328,418, 506 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला असून सदर गुन्ह्यात आरोपी भानुदास काशिनाथ मुरकुटे, वय 82 वर्ष , राहणार श्रीरामपूर यास श्रीरामपूर येथून दिनांक 08/10/2024 रोजी 01.35 वाजता अटक करण्यात आली आहे. या घटनेने जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे. याबाबत पुढील तपास राहुरी पोलीस करत आहेत.
0 टिप्पण्या