Ticker

6/Breaking/ticker-posts

ज्येष्ठ नेते शरद पवार व मा. आ.चंद्रशेखर घुले पाटील भेट ; भेटीचे कारण गुलदस्त्यात ?





लोकनेता  न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)


शेवगाव ( विशेष प्रतिनिधी ) :  अगदी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष तथा ज्येष्ठ नेते शरद पवार यांची शेवगावचे माजी आमदार चंद्रशेखर घुले पाटील यांनी काल शुक्रवारी ( दि.२५ रोजी ) रात्री पुणे येथे भेट घेतल्याने शेवगाव व पाथर्डी तालुक्यातील राजकीय धुरीनांच्या भुवया उंचावल्या आहेत.


      या भेटीत नेमकी काय चर्चा झाली तसेच श्री. पवार यांनी श्री. चंद्रशेखर घुले पाटील यांना काय कानमंत्र दिला ? याबाबतचा तपशील मात्र समजू शकला नाही. मात्र, ही चर्चा सकारात्मक झाल्याचे बोलले जाते. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, युवा नेते संजय कोळगे, शेवगाव पंचायत समितीचे माजी सभापती डॉ. क्षितिज घुले पाटील आदी उपस्थित होते. 

      

२२२, शेवगाव विधानसभा मतदारसंघासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातर्फे एडवोकेट प्रताप ढाकणे यांना उमेदवारी जाहीर झाली असून,  त्यांनी नामनिर्देशन पत्रही दाखल केले आहे. अशातच श्री. घुले यांनी श्री. पवार यांची भेट घेतल्याने शेवगाव - पाथर्डी विधानसभा मतदारसंघातील मतदार, कार्यकर्त्यांमध्ये चर्चेला उधाण आले आहे. दरम्यान, मंगळवार दि. २२ रोजी श्री. घुले यांनी मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते श्री. मनोज जरांगे पाटील यांची अंतरवाली सराटी येथे भेट घेतली. आता श्री पवार यांची भेट घेतल्याने श्री.  घुले यांच्या मनात नेमके काय चालले आहे ? याबाबतची उत्सुकता ताणली गेली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या