लोकनेता न्यूज
(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)
शेवगाव : श्रावण मासानिमित्त जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष सौ.राजश्रीताई चंद्रशेखर घुले पाटील यांनी माळेगाव - ने, (ता.शेवगाव) येथील शंभू महादेवाला जलाभिषेक घातला तसेच बिल्बपत्र अर्पण करत मनोभावे दर्शन घेतले.सर्वत्र पाऊस पडावा.जनतेचे व शेतकऱ्यांचे भले व्हावे, अशी प्रार्थना सौ.घुले यांनी शंभू महादेवाकडे केली.
हा ऐतिहासिक ठेवा जतन करण्याचे काम देवस्थानचे अध्यक्ष बाबा वाकडे, महंत पांडुरंग महाराज झुंबड तसेच विश्वस्त मंडळ करत आहे.माजी आमदार डॉ.नरेंद्र घुले पाटील व चंद्रशेखर घुले पाटील यांनी या देवस्थानच्या विकासासाठी भरीव निधी उपलब्ध करून दिलेला असल्याने देवस्थान परिसराचे रूपडे पालटले आहे.
0 टिप्पण्या