Ticker

6/Breaking/ticker-posts

प्रतापराव ढाकणेंच्या शिवार फेरीला ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद



लोकनेता  न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)


टाकळीमानुर-राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे प्रदेश सचिव प्रतापराव ढाकणे यांनी सुरु केलेल्या शिवार फेरीला जनतेतून प्रचंड प्रतिसाद लाभत आहे. कला पथकांच्या माध्यमातून केंद्र व राज्य सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणांचा विषय मांडत असल्याने ढाकणे यांच्या या यात्रेला ग्रामीण भागातील जनता पसंती देत आहे. 
प्रतापराव ढाकणे यांनी दि.02 जुलै पासून शेवगाव-पाथर्डी विधानसभा मतदार संघात शिवार फेरी यात्रा सुरू केली आहे. या वेळी अॅड.  ढाकणे यांचे थेट रानात शेतकरी उत्स्फूर्त स्वागत करीत आहेत.


मतदार संघाच्या गावातील वाडी-वस्ती  पिंजून काढत आहे. टाकळी मानूर पंचायत समिती गणा पासून त्यांनी या यात्रेला सुरूवात मोहटे करोडी कारेगाव चिंचपूर पांगुळ चिंचपुर इस दे वडगाव पिंपळगाव टप्पा टाकळीमानुर भिलवडे चुंबळे अंबिकानगर गाडेवाडी तांबेवाडी केली असुन, यात्रेतील शेवटच्या गावात ढाकणे हे गावकऱ्यांसोबत मुक्काम करतात. वाडी-वस्ती वरच्या अनेक समस्यां जाणून घेण्याचा त्यांचा उद्देश असून ते सकाळी 08 वाजे पासून  रात्री उशीरा पर्यंत दररोज दौरा करत आहेत. 

काल चिंचपूर इजदे येथे त्यांचा मुक्काम होता.  या ठिकाणी स्थानिक कला पथक यांनी केंद्र  व राज्य सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणां संदर्भात लोक गितांच्या माध्यमातून जनजागृती करत असून त्यांस ग्रामस्थांचा मोठा प्रतिसाद लाभत आहे. 


या वेळी बोलतांना ढाकणे म्हणाले या मतदार संघात अनेक विषय मागील दहा वर्षापासून प्रलंबित असून मुलभूत प्रश्न देखील लोक प्रतिनिधी सोडवू शकलेले नाहीत. मतदार संघाला पुर्वीचे वैभवशाली दिवस प्राप्त करूण देण्यासाठी आपण सर्वांनी एकजूट दाखवायला हवी स्वर्गवासी बबनराव ढाकणे यांनी मतदार संघात शेतीच्या पाण्यासाठी जेवढी कामे केली तेवढी आत्तापर्यंत एकही लोकप्रतिनिधीला तशी भरीव कामे करता आली नाहीत. सिंचन व्यवस्था, रस्ते सुविधा, विज पुरवठा, सुधारण्यासाठी आता आपल्याला परिवर्तन करायला पाहीजे. असे यावेळी ढाकणे म्हणाले.

यावेळी माजी सभापती गहिनीनाथ शिरसाट,  शहादेव शिरसाठ, पंडित बडे बप्पासाहेब शिरसाठ, संदीप शिंदे, राजेंद्र नागरे, भीवषण  खेडकर, अजित शिरसाट बिके ढाकणे, आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या