Ticker

6/Breaking/ticker-posts

' धाकट्या पंढरी'त आषाढी चा रंगला सोहळा













   लोकनेता  न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)

 शेवगाव : वारकऱ्यांची लाडकी ' धाकटी पंढरी ' अशी ओळख असलेल्या श्रीक्षेत्र वरुर,(ता.शेवगाव) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी आषाढी एकादशीच्या पूर्वसंध्येला बालदिंडी काढून श्रीविठ्ठल -  रुक्मिणीचे दर्शन घेतले.बाल दिंडीच्या निमित्ताने विद्यार्थ्यांनी अध्यात्म व संस्कृतीचे उत्कृष्ट दर्शन घडवले. 



      श्रीविठ्ठलाच्या वेशभूषेत विश्वजीत वावरे तर,रुक्मिणीच्या वेशभूषेत संध्या दाभाडे होती. बाल वारकऱ्यांनी पांढरा शुभ्र कुर्ता,पायजमा तर विद्यार्थिनींनी ब्लाऊज,साडी परिधान केली होती. कपाळी गोपीचंदन, बुक्क्याचा टिळा,गळ्यात टाळ, डोक्यावर तुळशी व मंगल कलश आणि मुखात नाम घेत बाल वारकऱ्यांनी मध्यवस्तीतील विठ्ठल - रुक्मिणीचे दर्शन घेतले. बाल वारकऱ्यांनी भजन म्हणत तसेच फुगड्या,पावल्या खेळत मनमुराद आनंद लुटला.


     मुख्याध्यापक श्री.घुले सर यांच्या नेतृत्वाखाली श्री.सुनील पायमोडे सर,भालेराव सर, सुसलादे सर,वैशाली गोरडे मॅडम,गुंजाळ मॅडम,भाग्यश्री म्हसे मॅडम,नंदाने मॅडम यांनी नेटके नियोजन केले होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या