Ticker

6/Breaking/ticker-posts

डॉ.मल्हारी लवांडे यांची उपकार्याध्यक्षपदी निवड

  
  

लोकनेता  न्यूज

    (ऑनलाईन न्यूज नेटवर्क


शेवगाव : पशुवैद्यकीय दुग्धव्यवस्थापन पशुसंवर्धन सेवा संघ महाराष्ट्र या राज्यस्तरीय संघटनेच्या उपकार्याध्यक्षपदी खरडगाव येथील डॉ.मल्हारी एकनाथ लवांडे यांची पाच वर्षासाठी ( सन २०२३ ते २०२८) बिनविरोध निवड झाली आहे.

 संघटनेच्या पुणे येथे नुकत्याच पार पडलेल्या बैठकीत निवडणूक अधिकारी सोपान पाटील यांनी नऊ सदस्यीय कार्यकारी मंडळ बिनविरोध निवडीची घोषणा केली.
     
डॉ.लवांडे यांनी शेवगाव तालुका अध्यक्ष तसेच प्रचार व प्रसिद्धी राज्य सदस्य म्हणून उत्कृष्ट कामगिरी केल्याने त्यांना राज्य पातळीवरील संघटनेत काम करण्याची संधी मिळाली आहे. राज्यात पशुपदविका धारकांची संख्या सुमारे १ लाख ८० हजार इतकी आहे.ते सर्वजण ग्रामीण भागात खेडोपाडी,वाडी वस्तीवर जाऊन शेतकऱ्यांकडील पशुधनाची सेवेच्या माध्यमातून काळजी वाहतात.पशुपदविका धारकांचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत.त्यांचे हक्क व न्याय्य प्रश्नांसाठी ही संघटना काम करते. या निवडीबद्दल डॉ.लवांडे यांचे नगर जिल्ह्यातून अभिनंदन होत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या