मुंडे समर्थकांचा निर्धार ; दादा काय बोलतात, याकडे राज्याचे लक्ष
ही उत्तर सभा नाही तर विकाससभा: कृषी मंत्री धनंजय मुंडे
लोकनेता न्यूज
(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)
बीड: येत्या 27 तारखेला बीडमध्ये आयोजित उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची सभा रेकॉर्ड ब्रेक मुंडे समर्थकांनी चंग बांधला असून सभेची जय्यत तयारी सुरू केलीय. दरम्यान ही सभा 17 तारखेला झालेल्या सभेला उत्तर नसून बीड जिल्ह्याच्या अस्मितेची सन्मानाची आणि विकासाची सभा असेल असे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी स्पष्ट केले . या सभेच्या तयारीसाठी ना. धनंजय मुंडे यांनी बीडमध्ये बैठक घेऊन पत्रकारांशी संवाद साधला. ते पुढे म्हणाले 27 तारखेची सभा ही यापूर्वीच होणार होती, मात्र काही कारणास्तव ती पुढे ढकलण्यात आली. ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या सभेला उत्तर देणारी ही सभा नाही तर बीड जिल्ह्याच्या विकासाची आणि सन्मानाची ही सभा असेल 17 तारखेला झालेल्या सभेला 2024 मध्ये जनताच काय ते उत्तर देईल असे ते म्हणाले.
बीडमध्ये राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची सभा झाली आणि या सभेमध्ये परळी येथील धनंजय मुंडे यांचे खंदे समर्थक बबन गीते यांनी शरद पवार यांच्या गटामध्ये प्रवेश केला. त्यानंतर धनंजय मुंडे यांच्या समोर आव्हान उभे राहिल्याच्या चर्चा सुरू झाल्या. मात्र त्याला उत्तर देताना मुंडे म्हणाले की, आतापर्यंत मी माझ्या आयुष्यात खूप संघर्ष केला आहे. माझ्यापुढे रोज नवनवीन आव्हाने आहेत. त्यामुळे त्या तुलनेत कोणतही आव्हान वाटत नाही. परळी मतदारसंघात केलेली विकास कामे लोकांच्या मनामध्ये स्थान मिळवून आहेत.त्यामुळे त्याचे मला चिंता नाही असेही मुंडे शेवटी म्हणाले.
सभेकडे राज्याचे लक्ष
दरम्यान शरद पवार यांनी राज्यातील येवल्यानंतर दुसरी स्वाभिमान सभा थेट बीडमध्ये घेऊन अजितदादांचे खास विश्वासू मानले जाणारे धनंजय मुंडे यांना टार्गेट केल्याचे मानले जाते. मुंडे समर्थक गीते यांना आपल्या गटात घेऊन त्याची झलक दाखविली. त्यावर अजितदादा आता काय बोलतात, याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.
राऊत हे पवार कुटुंबाचे सदस्य झाले आहेत का?
'शरद पवार यांची साथ सोडून भाजपासोबत गेलेले अजित पवार यांनी आता शरद पवार यांच्या संस्थेतील पदांचेदेखील राजीनामे द्यावेत', असे वक्तव्य खा . संजय राऊत यांनी केल्यानंतर राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी त्याला जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. ते म्हणाले,
कोणत्याही संस्थेतील राजीनाम्याचा प्रश्न हा अजित पवार आणि शरद पवार मिळून एकत्रितपणे घेतील, हा त्यांचा कौटुंबिक प्रश्न आहे. त्यामुळे राऊत हे पवार कुटुंबाचे सदस्य झाले आहेत का? असा बोचरा सवाल मुंडे यांनी केला.
0 टिप्पण्या