Ticker

6/Breaking/ticker-posts

जुन्या पिढीतील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते माणिकराव अण्णा शिरसाठ यांचे देहावसान

 

लोकनेता  न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)

टाकळीमानुर :- दि. २ ऑक्टोबर २२

पाथर्डी तालुक्यातील टाकळीमानुर येथील जुन्या पिढीतील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते जिल्हा स्थायी समितीचे माजी सदस्य विविध कार्यकारी सेवा संस्थेचे माजी अध्यक्ष कैमाणिकराव अण्णा विठ्ठलराव शिरसाठ यांचे रविवारी रात्री एक वाजून पाच मिनिटांनी वृद्धापकाळाने निधन झाले त्यांचे वय ८७ वर्ष होते.

त्यांच्यावर रविवारी सकाळी ११ वाजता टाकळीमानुर येथील स्मशानभूमीमध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी पाथर्डी तालुक्यातील विविध राजकीय सामाजिक शैक्षणिक धार्मिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. माजी सरपंच बप्पासाहेब शिरसाठ यांचे ते चुलते होते तर डॉक्टर नागेश शिरसाठ यांचे ते वडील होत. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, दोन नातवंडे, नात सून आहेत .


ते अत्यंत धार्मिक मनमिळावू होते.  संत वामनभाऊ महाराज, संत भगवान बाबा यांच्यावर त्यांची नितांत श्रद्धा होती गहीनीनाथ गड, भगवानगड, पंढरपूर , पैठणच्या त्यांनी पायी वाऱ्या केल्या आहेत .


माजी केंद्रीय मंत्री बबनरावजी ढाकणे स्वर्गीय माजी आमदार दगडू पाटील बडे संघर्ष योद्धा बबनराव ढाकणे केदारेश्वर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष प्रतापराव ढाकणे यांचे ते नातलग होते गेल्या पंधरवड्यात प्रतापराव ढाकणे त्यांची भेट घेण्यासाठी आले असता मनमोकळ्यापणाने अर्धा तास गप्पा मारत होते शेवटच्या क्षणापर्यंत डोळे कान सर्व इंद्रिय त्यांचे उत्तम प्रकारे कार्य करत होते त्यांच्या निधनाने परिसरात दुःख व्यक्त केले जात आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या