Ticker

6/Breaking/ticker-posts

वंचित घटकांसाठी उपक्रम राबवून निरंजन संस्थेने सेवेचा वेगळा ठसा उमटवला : नरेंद्र फिरोदिया

 



लोकनेता  न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)

नगर – नवरात्र आणि दांडियाचे घनिष्ठ नातं आहे. प्रत्येकाला दांडिया खेळण्याची इच्छा असते. मात्र आपले शेकडो बंधू भगिनी असे आहेत की ते या आनंदा पासून दूर असतात. अशांसाठी निरंजन सेवाभावी संस्थेने पुढाकार घेत त्यांच्या साठी रास दांडियाचे आयोजन करून खूप कौतुकास्पद उपक्रम हाती घेतला आहे. शहरतील सर्व संस्थांमधील वंचित घटकांसाठी वर्षभर विविध उपक्रम राबवून निरंजन सेवाभावी संस्थेने नाविन्य निर्माण करत आपला वेगळा ठसा उमटवला आहे. वर्षभराच्या उपक्रमांचे उत्कृष्ट नियोजन केलेले असल्याने ते सफल होत आहेत. म्हणूनच निरंजन संस्थेच्या सर्व उपक्रमांमध्ये सहभागी होत आहे, असे प्रतिपादन नगर क्लबचे सचिव व उद्योजक नरेंद्र फिरोदिया यांनी केले.


नगरमधील निरंजन सेवाभावी संस्थेच्या वतीने नवरात्र उत्सवा निमित्त शहरातील स्नेहालय, सावली, बालघर प्रकल्प, अनाम प्रेम आदी संस्थांमधील २०० मुलामुलींसाठी रास दांडिया व गरबाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्याक्रमचे उद्घाटन नरेंद्र फिरोदिया यांच्या हस्ते झाले. यावेळी जितो संस्थेचे अध्यक्ष अमित मुथा, शिवसेनेचे शहर प्रमुख संभाजी कदम, उद्योजक अनुराग धूत, कमलेश झंवर, पराग मानधना, निरंजन संस्थेचे अध्यक्ष अतुल डागा, सचिव मुकुंद धूत आदींसह निरंजन संस्थेचे सदस्य उपस्थित होते. हा रास दांडियाचा कार्यक्रम इतका रंगला की उपस्थित सर्व पाहुण्यांनीही मुलामुलीं बरोबर ठेका धरत दांडिया खेळण्याचा आनंद घेतला. सर्व सहभागी मुलामुलींनीही मनसोक्त नाचण्याचा आनंद लुटला. दांडिया नंतर सर्वांनी स्नेहभोजनाचाही आनंद घेतला.


अमित मुथा म्हणाले, निरंजन संस्था शहरातील वंचित घटकाला आपल्या बरोबर घेत त्यांना सणासुदीच्या आनंदांत सहभागी करून घेत आहे. सेवेच्या दृष्टीने काम करत असल्याने निरंजन संस्था अजून पुढे जाईल.


    संभाजी कदम म्हणाले, रास दांडिया मुळे सर्व मुलांच्या चेहऱ्यावर आलेला आनंद पाहून मोठे समाधान वाटत आहे. अशा उपक्रमासाठी निरंजन संस्थेच्या सर्व टीमला शुभेच्छा.


    प्रास्ताविकात अतुल डागा म्हणाले, निरंजन सेवाभावी संस्थेच्या नगर शाखेच्या वतीने सर्व संस्थांमधील विद्यार्थी दत्तक घेवून वर्षभर त्यांच्यासाठी शैक्षणिक उपक्रम राबवत आहोत. तसेच आंबे खाण्याचा उपक्रम, असे अमेक उपक्रम राबवत आहोत. लवकरच या मुलांसाठी डीजीटल क्लासरूम तयार करणार आहोत.


      हा उपक्रम यशस्वी होण्यसाठी निरंजन संस्थेच्या स्वप्नील कुलकर्णी, रविकांत काबरा, विशाल झंवर, धनेश खत्ती, सुहास चांडक, सुमित चांडक, योगेश सिकची, अभिजित बिहाणी, पवन बिहाणी व हरीश काबरा आदी सदस्यांनी परिश्रम घेतले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या