Ticker

6/Breaking/ticker-posts

पाऊलबुधे फार्मसी महाविद्यालयात 'फार्मासिस्ट डेʼ साजरा

 



लोकनेता  न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क

अहमदनगर -  येथील डॉ. ना.ज पाऊलबुधे कॉलेज ऑफ फार्मसी महाविद्यालयात २५ रोजी "जागतिक फार्मासिस्ट डे"  साजरा करण्यात आला. 

     कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणुन बी.एड महाविद्यालयाच्या प्राचार्य डाॅ. रेखाराणी खुराना, डाॅ. सुचित्रा डावरे, प्रा.वंदना घोडके  संस्थेचे पदाधिकारी रघुनाथ कारमपुरे उपस्थित होते .

    

 संस्थेचे अध्यक्ष  विनय पाऊलबुधे  यांच्या मार्गदर्शनाखाली जागतिक फार्मासिस्ट दिन २०२२ ची संकल्पना निरोगी जगासाठी फार्मसी एकत्रितपणे कार्ये करत आहे.  यावेळी    सामुहिक फार्मासिस्ट प्रतिज्ञा घेण्यात आली. तसेच स्पर्धांसह विविध उपक्रम राबविण्यात आले.  


यावेळी कारमपुरे यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. करोनाच्या काळात ऑक्सिजनला किती महत्त्व आले होते हे पटवून देत निसर्गाकडून आपल्याला ऑक्सिजनचे भरभरून वरदान मिळाले आहे , ते आपण जोपासले पाहिजे, असे त्यांनी सांगितले. प्राचार्य भरत बिडवे यांनी रोपांचे संवर्धन कसे करावे वृक्ष हेच जीवन असल्याचे  सांगितले.


कार्यक्रमास फार्मसी कॉलेजचे प्राचार्य  डॉ. निलेश जाधव, डी. फार्मसीच्या  प्राचार्या अनुराधा चव्हाण, माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य भरत बिडवे,  रात्र महाविद्यालयाचे प्राचार्य संदीप कांबळे, डी. एडच्या प्राचार्या सविता सानप   सांस्कृतिक विभागाचे प्रमुख सुधीर गर्जे  व काजळ जोंधळे    तसेच कर्मचारी  उपस्थित होते. सुत्रसंचालन प्रणाली अनमल  यांनी केले. तर आभार  चिंतामणी ईशान यांनी मानले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या