Ticker

6/Breaking/ticker-posts

सहकारमहर्षी जगन्नाथ तात्या राळेभात यांचे निधन









लोकनेता  न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)

जामखेड :- सहकारमहर्षी जगन्नाथ तात्या राळेभात यांचे बुधवार (ता.07) रोजी अल्पशा आजाराने पुणे येथील दिनानाथ मंगेशकर हाँस्पीटलमध्ये उपचारा दरम्यान निधन झाले. 


त्यांच्या निधनाने जामखेड तालुक्यातील सहकाराच्या राजकारणातील दिग्गज नेतृत्व काळाच्या पडद्याआड गेले. तात्या हे कुठलाही राजकीय वारसा पाठीशी नसताना नावारुपाला आलेले नेते होते. त्यांनी स्वतःच्या हिंमतीवर सहकाराच्या राजकारणात अनेक वर्षे दबदबा टिकून ठेवला . त्यांना तालुक्यात जगन्नाथ मिस्तरी तर जिल्ह्यात ‘ तात्या ‘ या आदरार्थी नावाने संबोधले जात होते.


सहकार महर्षी तात्या हे काही दिवसांपासुन आजारी होते . पुणे येथील दिनानाथ मंगेशकर रूग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते . दोन दिवसापूर्वी ते रुग्णालयातून जामखेडला घरी आले होते . मात्र त्यांची तब्बेत पुन्हा बिघडल्याने त्यांना मंगळवारी उपचार्थ पुण्याला नेले होते . 


उपचारा दरम्यान बुधवार (ता.07) रोजी सकाळी रुग्णालयातच त्यांची प्राणज्योत मालवली .त्यांची दोन्ही मुले सुधीर आणि अमोल हे तात्यांच पार्थिव घेऊन  जामखेडला पोहचत आहेत. त्यांच पार्थिव त्यांच्या जामखेड येथील निवासस्थानी येईल. काही काळ अंत्यदर्शनासाठी ठेवले जाईल तदनंतर  आजच रात्री  त्यांच्या पार्थीवावर अत्यसंस्कार होणार आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या