Ticker

6/Breaking/ticker-posts

अहमदनगर फटाका असोसिएशनचे कार्य कौतुकास्पद - पो. नि. संपतराव शिंदे

 फटाका असोच्या वतीने कोतवाली पोलिसांना टी शर्ट चे वाटप

लोकनेता  न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)

नगर -दि अहमदनगर फटाका व्यापारी असोसिएशन चे वतीने  पोलिसांना टी शर्ट चे वाटप कोतवाली पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संपतराव शिंदे व फटाका असोसिएशनचे अध्यक्ष श्रीनिवास बोज्जा यांचे हस्ते करण्यात आले.


या वेळी बोलतांना  शिंदे म्हणाले, फटाका असोसिएशन ही व्यापारी संस्था असून सामाजिक बांधिलकी च्या नात्याने सामाजिक कार्यात सहभाग घेऊन पोलिसांच्या आनंदात सहभागी होण्याचे कार्य केले.  


गणेशोत्सव म्हटले की पोलिसांना जास्त तणाव असतो तरी देखील कोतवाली पोलिसांनी पोलीस स्टेशन मध्ये श्री गणेशाची स्थापना करून गेले सात दिवस नित्य नियमाने आरती करून आज विसर्जन करण्याचे नियोजन केले असून या विसर्जन मिरवणुकीसाठी फटाका असोसिएशन च्या वतीने टी शर्ट चे वाटप करून पोलिसांचा आनंद द्विगुणित केला.


या वेळी असोसिएशनचे अध्यक्ष श्रीनिवास बोज्जा म्हणाले आमच्या फटाका व्यवसायासाठी पोलिसांचे नेहमीच सहकार्याची भावना असते , त्याची उतराई म्हणून हा सामाजिक उपक्रम राबविण्याचा प्रयत्न केला.


या वेळी असोसिएशनचे सचिव संतोष बोरा यांनी उपस्थितांचे स्वागत केले. तर आभार अरविंद साठे यांनी मानले. या वेळी पोलीस कर्मचारी पो कॉ.राजेंद्र गर्गे दादा, पो कॉ.योगेश खामकर, पो कॉ.योगेश भिंगारदिवे, पो कॉ. दीपक रोहकले, पो कॉ. उमेश शेरकर, पो कॉ. सुयश हिवाळे, पो कॉ. तानाजी पवार तसेच असोसिएशन चे कार्याध्यक्ष सुरेश जाधव, सदस्य देविदास ढवळे, सुनील गांधी, मयूर भापकर, साहेबराव गारकर, संजय सुराणा, विकास पटवेकर, विजय मुनोत, सुनील पोपटानी आदी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या