Ticker

6/Breaking/ticker-posts

धनुष्यबाण चिन्हाबाबत निर्णयाचा चेंडू आता निवडणूक आयोगाच्या कोर्टात..!

 






लोकनेता  न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)

 नवी दिल्ली :- राज्यातील शिवसेना पक्षांतर्गत चाललेल्या वादात आता धनुष्यबाण हे चिन्ह नेमके कोणत्या गटाला मिळणार याबाबत सर्वोच्च न्यायालयात दाखल याचिकेवर दोन्ही बाजूने  युक्तिवाद झाला असून अखेर , घटनापीठाने याबाबत निर्णय देण्यास स्पष्ट नकार देत चिन्ह बाबत निवडणूक आयोगाला निर्णय देण्याचे आदेश दिले आहेत.


काल नवी दिल्लीत सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्ती डी वाय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखाली न्यायमूर्ती कृष्ण मुरारी यांचेसह ४न्याय मुर्तींसमोर सुनावणी झाली. विशेष  म्हणजे या सुनावणीचे थेट प्रक्षेपण करण्यात आले  . महाराष्ट्रातील या सुनावणीपासून देशातील महत्त्वाच्या प्रकरणांच्या सुनावणीचे थेट प्रक्षेपण करण्यास सर्वोच्च न्यायालयाने सुरुवात केली आहे,


 मंगळवारी सकाळी 11 वाजेपासून संध्याकाळी पाच वाजेपर्यंत तब्बल सहा तास ही सुनावणी चालली. यामध्ये  उद्धव ठाकरे यांच्या बाजूने ऍड. कपिल सिबल ॲड. अभिषेक शिंगवी तर शिंदे गटाच्या बाजूने सिंघवी तर शिंदे गटाच्या बाजूने अड. महेश मला आणि मिरज कौल मनिंदर सिंग यांनी जोरदार व्यक्तिवाद केला आता धनुष्यबाण चिन्ह  निवडणूक आयोगाच्या कोर्टात गेले असून निवडणूक आयोग याबाबत काय निर्णय घेतो याकडे राज्याचे लक्ष लागले आहे .

पार्श्वभूमी  ज्या वेळी अशी परिस्थिती निर्माण होते , त्यावेळी चिन्ह गोठविण्याची कार्यवाही झालेली आहे. काँग्रेसच्या काळात काँग्रेस फुटल्यानंतर त्यांचे असलेले बैलजोडी चिन्ह गोठविण्यात आल्याचा इतिहास आहे. दरम्यान निवडणुका आयोग आता काय निर्णय घेनार याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या