Ticker

6/Breaking/ticker-posts

रशिया- युक्रेन संघर्षात भारत आता महत्त्वाच्या भूमिकेत ! शांततेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पुढाकार

 लोकनेता  न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)

नवी दिल्ली : रशिया आणि युक्रेन यांच्यात शस्त्रात्रांसहीत सुरू झालेल्या संघर्षाचा आजचा दुसरा दिवस आहे. या संघर्षात अमेरिकेनंही महत्त्वाची भूमिका बजावलीय, असं म्हटलं तर वावगं ठरायला नको. मात्र, या वादात भारतही आता महत्त्वाच्या भूमिकेत येतोय.

रशियानं युक्रेनवर केलेल्या लष्करी कारवाईनंतर या संकटासंबंधी अमेरिका भारतासोबत संवाद साधणारअसल्याचं वक्तव्य अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांनी गुरुवारी केलं. ते युक्रेन संकटावर आयोजित करण्यात आलेल्या 'व्हाईट हाऊस'मधील एका पत्रकार परिषदेत बोलत होते. आम्ही भारताशी चर्चा (युक्रेन संकटाबाबत) करूअसं वक्तव्य जो बायडेन यांनी यावेळी केलं.


रशियन हल्ल्यासंबंधी भारत पूर्णपणे अमेरिकेसोबत आहे का? असा प्रश्न बायडेन यांना विचारण्यात आला होता.

आंतरराष्ट्रीय पातळीवर युक्रेन संकटाबाबत भारत आणि अमेरिकेची भूमिका सारखीच नसल्याचं समजलं जातंय. भारताची रशियाशी जुनी आणि सुदृढ मैत्री आहे. सोबतच, गेल्या दीड दशकात अमेरिकेसोबतही भारताची धोरणात्मक भागीदारी अभूतपूर्व वेगानं वाढलीय.


दरम्यान, युक्रेनला युद्धात हरएक प्रकारे मदत उपलब्ध करून देण्याच्या वल्गना करणाऱ्या अमेरिकेनं रशियाच्या हल्ल्यानंतर मात्र युद्धात प्रत्यक्ष सहभागी न होण्याचा निर्णय घेतलाय. अमेरिकेनं रशियावर नवीन निर्बंध लादण्याची घोषणा केलीय. व्लादिमीर पुतीन यांनी युद्धाची निवड केली असली तरी रशियन जनतेला याची मोठी किंमत चुकवावी लागेल, असा इशारा अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांनी दिला आहे. 'नाटो'च्या प्रत्येक इंच जमिनीचे संरक्षण केले जाईल या आपल्या वचनाचा बायडेन यांनी पुनरुच्चार केला असला तरी युक्रेनमध्ये अमेरिकेचं सैन्य तैनात केलं जाणार नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलंय.


दरम्यान, भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी रात्री उशिरा रशियाचे आपले समकक्ष व्लादिमीर पुतीन यांच्याशी फोनवरून चर्चा केली व युक्रेनमध्ये शांतता प्रस्थापित व्हावी, यासाठी आवाहन केलं. मोदी - पुतीन या दोन जागतिक स्तरावर महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या नेत्यांत जवळपास २५ मिनिटांची चर्चा झाली. मोदी - पुतीन यांच्यातील चर्चा सकारात्मक राहिली. युद्धानं कोणतेही प्रश्न सुटू शकत नाहीत, असं नमूद करतानाच युक्रेनमधील हिंसाचार तत्काळ थांबला पाहिजे व तिथे शांतता प्रस्थापित व्हायला हवी, असं आवाहन मोदी यांनी यांनी पुतीन यांना केल्याचं सांगण्यात आलं.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या