Ticker

6/Breaking/ticker-posts

ह.भ.प. रघुनाथ वायभासे (महाराज) यांचे निधन

 










कै. ह.भ.प. रघुनाथ (महाराज) वायभासे 


लोकनेता  न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)


नगर : घाटापिंपरी (ता.आष्टी) येथील प्रसिद्ध कीर्तनकार ह.भ.प. रघुनाथ वामनराव वायभासे (महाराज) यांचे शनिवार (दि.२७ नोव्हेंबर २०२१) रोजी रात्री नगर येथील घरी वृद्‍धापकाळाने निधन झाले. त्यांचे वय ९० वर्षे होते. त्यांचेवर रविवारी सकाळी नगरच्या अमरधाम येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी मोठा जनसमुदाय उपस्थित होता. त्यांच्या मागे पत्नी१ भाऊ, ३ मुले१ मुलगीजावईसुनानातवंडे असा परिवार आहे.

कै. रघुनाथ वायभासे (महाराज) भाऊ या टोपन नावाने देखील ओळखले जात. त्यांनी देहू, आळंदी, पैठण, पंढरपुर, गहिनीनाथ गड आदी ठिकाणी अनेक वर्ष दिंडीच्या माध्यातून पायी वारी केली. तसेच गावो-गाव हरीनाम सप्ताहाच्या माध्यमातून कीर्तनाद्वारे समाज प्रबोधन केले.  त्यांचेवर संत तुकाराम महाराज व संत वामनभाऊंच्या विचारांचा विशेष प्रभाव होता. गळ्यात तुळ्सीची माळ, फेटा, कपाळी गंध, बलदंड शरीरयष्टी आणी पहाडी आवाज असे त्यांचे भारदस्त व्यक्तिमत्व होते. त्यामुळे ते कीर्तनाला उभे राहिले की, श्रोत्यांच्या मनाचा अचूक ठाव घेत आपला मुद्दा प्रभावीपणे पटवुन देत असत. 

दिनकर वायभासे, विठ्ठ्लराव वायभासे, काकासाहेब वायभासे यांचे ते वडील होत. त्यांच्या निधनामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. त्यांचा दशक्रिया विधी सोमवार ( दि. ६ डिसेंबर २०२१ )  रोजी त्यांच्या मुळ गावी घाटापिंपरी (ता.आष्टी, जि. बीड ) येथे होणार आहे.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या