Ticker

6/Breaking/ticker-posts

MPSC: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षांचे वेळापत्रक नोव्हेंबरमध्ये

 


लोकनेता  न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)

 

मुंबई :महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून MPSC २०२२ मध्ये घेण्यात येणाऱ्या अंदाजित स्पर्धा परीक्षांचे वेळापत्रक येत्या नोव्हेंबर महिन्याच्या अखेरीस घेण्यात येणार आहे, अशी माहिती एमपीएसी प्रशासनाकडून देण्यात आली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना पुढील वर्षी होणाऱ्या परीक्षांची तयारी करण्यासाठी पुरेशी कल्पना येणार आहे.

'एमपीएससी'च्या परीक्षा कधी होतील, वेळापत्रक काय असेल, सर्वाधिक पदे कोणत्या परीक्षेसाठी असतील, अशा अनेक प्रश्नांबाबत राज्यातील साधारण चार लाख विद्यार्थ्यांमध्ये उत्सुकता असते. त्यामुळे दरवर्षी आयोगाकडून या परीक्षांचे अंतिम वेळापत्रक डिसेंबरमध्ये जाहीर होते. यंदा हे अंदाजित वेळापत्रक नोव्हेंबर अखेर जाहीर करण्यात येईल, अशी माहिती 'एमपीएससी'ने ट्विटर हँडलद्वारे दिली आहे. करोना प्रादुर्भावामुळे २०२२मधील स्पर्धा परीक्षा होतील की नाही, याबाबत साशंकता होती. त्याचबरोबर राज्य सरकारची आर्थिक परिस्थिती कमकुवत झाल्याने, यंदा पदभरती होणार नाही किंवा पुढे ढकलण्यात येईल, असे सांगण्यात येत होते. मात्र, 'एमपीएससी'ने याबाबत अधिकृत माहिती प्रसिद्ध करून पदभरतीच्या परीक्षा होतील, असे स्पष्ट झाले आहे.

मुख्य परीक्षांच्या तारखा लवकरच

राज्य सेवा मुख्य परीक्षा २०२० आणि महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा २०२० या दोन परीक्षांच्या तारखा येत्या आठवड्यात प्रसिद्ध करण्यात येणार आहेत. त्यामुळे पूर्व परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना दिलासा मिळेल. याबाबतची माहितीही 'एमपीएससी'ने अधिकृत ट्विटर हँडलद्वारे दिली आहे. अधिक माहितीसाठी आयोगाच्या वेबसाइटला भेट देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या