Ticker

6/Breaking/ticker-posts

MAH CET 2021: कोणती सीईटी कधी? जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक

 


लोकनेता  न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)

 

मुंबई ::शैक्षणिक वर्ष २०२१-२२ करिता राज्य सामायिक प्रवेश परीक्षा सीईटी दिनांक १५ सप्टेंबर ते १० ऑक्टोबर २०२१ या कालावधीत होणार असल्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी मंत्रालयात झालेल्या पत्रकार परिषदेत जाहीर केले.

उच्च व तंत्रशिक्षण मंत्री सामंत म्हणाले, सर्व अभ्यासक्रमांच्या परीक्षांसाठी एकूण ८ लाख ५५ हजार ८७९ विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. या प्रवेश परीक्षांसाठी २२६ केंद्रे निश्चित करण्यात आलेली आहेत. तसेच राज्याबाहेरील केंद्रांच्या संख्येतही या वर्षी वाढ करण्यात आलेली असून परीक्षा केंद्रांची संख्या वाढवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

सीईटी परीक्षांचे वेळापत्रक पुढीलप्रमाणे -

मास्टर ऑफ कॉम्प्युटर अॅप्लिकेशन्स - MAH-MCA-CET - १५ सप्टेंबर २०२१

मास्टर ऑफ हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरिंग टेक्नॉलॉजी - MAH-M.HMCT - १५ सप्टेंबर २०२१

मास्टर ऑफ आर्किटेक्चर - MAH-M.Arch-CET - १५ सप्टेंबर २०२१

मास्टर ऑफ फिजिकल एज्युकेशन - MAH-M.P.Ed-CET - १५ सप्टेंबर २०२१

मास्टर ऑफ फिजिकल एज्युकेशन - MAH-M.P.Ed-Physical Test (Offline) - १६, १७ व १८ सप्टेंबर २०२१

बॅचलर ऑफ आर्ट्स/बॅचलर ऑफ सायन्स/बॅचलर ऑफ एज्युकेशन (Four year integrated course)- MAH-B.A/B.Sc.,BEd CET - १५ सप्टेंबर २०२१

मास्टर ऑफ बिझनेस अॅडमिनिस्ट्रेशन अँड मॅनेजमेंट स्टडीज - MAH-MBA/MMS CET - १६, १७ व १८ सप्टेंबर २०२१

बॅचलर ऑफ इंजिनीअरिंग/टेक्नॉलॉजी, फार्मसी, अॅग्रीकल्चर - MHT-CET 2021 - २० सप्टेंबर ते १ ऑक्टोबर २०२१

बॅचलर ऑफ हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरिंग टेक्नॉलॉजी - MAH-B.HMCET - ३ ऑक्टोबर २०२१

मास्टर ऑफ एज्युकेशन - MAH-M.Ed.-CET- ३ ऑक्टोबर २०२१

बॅचलर ऑफ एज्युकेशन, मास्टर ऑफ एज्युकेशन (तीन वर्ष कालावधी) - MAH-B.Ed. M.Ed.-CET- ३ ऑक्टोबर २०२१

बॅचलर ऑफ लॉ (इंटिग्रेटेड) - MAH-LLB-5Yrs-CET- ३ ऑक्टोबर २०२१

बॅचलर ऑफ फिजिकल एज्युकेशन - MAH-B.P.Ed.-CET- ३ ऑक्टोबर २०२१

बॅचलर ऑफ फिजिकल एज्युकेशन - MAH-B.P.Ed.Test (Offline)- ४ ते ७ ऑक्टोबर २०२१

बॅचलर ऑफ लॉ (३ वर्ष) - MAH-LLB-Yrs-CET- , ५ ऑक्टोबर २०२१

बॅचलर ऑफ एज्युकेशन जनरल अँड स्पेशल - MAH-B.Ed. CET And B.Ed. CET+ELCT- ६ व ७ ऑक्टोबर २०२१

बॅचलर ऑफ फाइन आर्ट (ऑफलाइन)- MAH-AAC-CET- ९ आणि १० ऑक्टोबर २०२१

या परीक्षेचा निकाल २० ऑक्टोबर पर्यंत जाहीर करण्यात येणार असून शैक्षणिक वर्ष २०२१-२२ नोव्हेंबरपासून सुरु होईल. हे शैक्षणिक वर्ष सुरु करताना राज्यातील त्या वेळेची कोरोनाची परिस्थिती पाहून ऑनलाईन सुरु करायचे की ऑफलाईन याबाबत निर्णय घेण्यात येईल.

खुल्या प्रवर्गातील गुणवंत मुलामुलींना परदेशातील नामांकित विद्यापीठामध्ये शिक्षण घेण्यासाठी गुणवंत मुलामुलींना परदेशात उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती मंजूर करणेया योजनेच्या लाभासाठी विद्यार्थ्यांची व त्यांच्या पालकांची वार्षिक उत्पन्न मर्यादा शैक्षणिक वर्ष २०२१-२२ पासून ८ लाख रुपये इतकी करण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली शासनाने घेतला आहे, असेही सामंत यांनी सांगितले. राज्य सीईटी कक्षाच्या www.mahacet.org या अधिकृत संकेतस्थळावर तपशीलवार वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. अशी माहितीही यावेळी देण्यात आली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या