Ticker

6/Breaking/ticker-posts

रोहित पवार यांनी श्रेय वादात अडकवली दोन वर्ष पाणीपुरवठा योजना – माजी मंत्री राम शिंदे


 

या योजनेसाठी सर्व कागदपत्रांची पूर्तता,पाणी आरक्षण देखील मंजूर आम्हीच केले होते.

लोकनेता  न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)

 

जामखेड :उजनी वरून जामखेड साठी आणलेल्या पाणी पुरवठा योजनेचे श्रेय घेण्यासाठी आमदार रोहित पवार यांनी हि योजना दोन वर्ष अडकवली तसेच माझ्याच  काळातील कामे  रस्ते ,पाणीपुरवठा योजनांचे उद्घाटन आमदार रोहित पवार करत असल्याचा आरोप माजी मंत्री राम शिंदे यांनी जामखेड  येथे झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये केला आहे.

 

यावेळी जिल्हा बँकेचे संचालक  आमोल राळेभात, पं स सदस्य डॉ भगवान मुरूमकर , रवी सुरवसे, अध्यक्ष अजय काशिद, प्रविण चोरडीया,संचालक  तुषार पवार, भाजपा युवा मोर्च्याचे तालुकाध्यक्ष शरद कार्ले, उपाध्यक्ष मोहन गडदे, नगरसेवक अमित चिंतामणी,सोमनाथ राळेभात, बाळासाहेब गोपाळघरे,   सरपंच बापुराव ढवळे वैजीनाथ पाटिल,प्रविण सानप, गौतम कोल्हे, तात्याराम पोकळे, डॉ अलताब शेख, शहर अध्यक्ष बिभिषन धनवडे, शहर अध्यक्ष आभिजित राळेभात,उदयसिंह पवार, आदी उपस्थित होते. 

जामखेड नगरपरिषद साठी आणलेल्या १३९ कोटी रुपयांच्या योजनेवरून भाजप राष्ट्रवादी मध्ये श्रेय वादावरून आरोप प्रत्यारोपांच्या फैरी सुरु झाल्या आहेत. यानिमित्ताने भाजपचे माजी मंत्री राम शिंदे यांनी पत्रकार परिषद घेऊन माझ्याच काळात हि योजना मंजूर झाली असून श्रेय वादामुळे हि योजना दोन वर्ष आमदार रोहित पवार यांनी रखडली आहे. त्यामुळे जामखेडकरांना गेल्या दोन वर्षापासून पाण्यापासून वंचित ठेवण्याचे काम आमदार रोहित पवार यांनी केले असल्याचा घणाघात माजी मंत्री राम शिंदे यांनी केला आहे.

जामखेड शहर व परिसरासाठी आमच्या सरकारच्या काळात सुमारे 106.कोटी रूपये ची पाणी पुरवठा योजना तांत्रिक मंजुरी घेतली होती. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर सभेत तांत्रिक मंजुरीचे पत्र माजी मंत्री राम शिंदे यांच्या समवेत नगरपरिषदेचे तत्कालीन पदाधिकारी यांना दिले होते. सदरची योजना माझ्या संकल्पनेतून व जनतेची कायमची सोय व्हावी म्हणून हि पाणीपुरवठा योजनेसाठी शर्तीचे प्रयत्न केले होते. आमदार रोहित पवार हे  आम्ही मंजूर केलेली कामांचे उदघाटन करत आहेत. एकही सिंमेट बंधारा आणला नाही,नवीन रस्ते आणले नाहीत. त्यामुळे आमदार फक्त  श्रेय घेण्याचे काम करत असल्याचा आरोप माजी मंत्री राम शिंदे यांनी केला.

 

{आमदार रोहित पवार हे आजोबांचे ऐकत नाही तर मुख्यमंत्र्यांचे कधी ऐकणार

  गेल्या दोन वर्षापासून कोरोनाचे संकट देशासह राज्यात असून या कोरोना पासून दूर ठेवण्यासाठी त्यांचे सुरक्षित अंतर व मास्क वापरणे बंधनकारक असताना कर्जत  येथे गोदड महाराज मंदिरात स्वराज्य ध्वजाचे कार्यक्रमाचे आयोजन केले या कर्यक्रमाला मोठा जनसमुदाय उसळला होता. यात कोरोनाच्या नियमांचे उलंघन केले असून यामध्ये आमदार रोहित पवार जबाबदार असून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी माजी मंत्री राम शिंदे यांनी जामखेड येथे झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये केली आहे.}

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या