Ticker

6/Breaking/ticker-posts

शेवगाव तालुका काँग्रेसची निवडणुका संदर्भात आढावा बैठक संपन्न

 


लोकनेता  न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)

 

शेवगाव: शेवगाव तालुका काँग्रेस पक्षाची बुथ बांधणी व आगामी निवडणुका संदर्भात आढावा बैठक शेवगाव येथे जिल्हाध्यक्ष  बाळासाहेब साळुंके यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.  काँग्रेस पक्षाचे विधिमंडळ पक्षनेते तथा महसूल मंत्री ना. बाळासाहेब थोरात, प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नानाभाऊ पटोले, जिल्हा काँग्रेसचे मार्गदर्शक आ. डॉ. सुधीर तांबे व महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजित दादा तांबे यांच्या सुचनेनुसार आयोजित या बैठकीस अहमदनगर जिल्हा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब साळुंके यांच्या अध्यक्षतेखाली व जिल्हा समन्वयक  ज्ञानदेव वाफारे, जिल्हा बँकेचे संचालक गणपतराव सांगळे, युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष स्मितल वाबळे , अनुसूचित सेलचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र वाघमारे, नगरपरिषद निरीक्षक कार्लस साठे यावेळी उपस्थित होते.

 यावेळी जिल्हाध्यक्ष साळुंके यांच्याकडून आगामी तालुक्यातील नगरपरिषद, जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुक काँग्रेस पक्ष सर्व  ताकतीने व स्वबळावर लढविणार असल्याची घोषणा करण्यात आली.  तालुका काँग्रेसच्या सर्व पदाधिकाऱ्यांकडून एकमुखाने या घोषणेचे स्वागत करण्यात आले. तसेच श्री वाफारे यांच्याकडून तालुका काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांना बूथ बांधणी, आगामी नगर परिषद व स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका संदर्भात विविध सूचना करण्यात आल्या. तालुका काँग्रेसचे अध्यक्ष डॉ. अमोल फडके यांच्याकडून बुथ बांधणी संदर्भात सुरू असलेले कामकाजाचा  उपस्थितांसमोर आढावा  मांडण्यात आला. 

 यावेळी तालुकाध्यक्ष डॉ अमोल फडके, माजी सभापती प्रकाश भोसले, युवा अध्यक्ष बब्रु वडघने, शहराध्यक्ष किशोर कापरे, मुंगीचे उपसरपंच दसपुते, मळेगावचे माजी सरपंच रघुनाथ सातपुते, गणेश क्षिरसागर, राजु शेळके, सुरेश निकाळजे, दशरथ धावणे, निजाम पटेल, महेश काटे, समीर काझी, प्रकाश तुजारे, सुधीर बाबर, अमोल दहिफळे, सोपान घोरतळे, योगेश भोसले, बाळासाहेब शिंगाडे, अक्षय केदार, जब्बार शेख, स्वप्निल सुपारे , रामचंद्र मिसाळ आदी कार्यकर्ते उपस्थित होते. सूत्रसंचालन बब्रु वडघने यांनी केले तर किशोर कापरे यांनी आभार व्यक्त केले. 

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या