Ticker

6/Breaking/ticker-posts

जिल्ह्यातील ब्युटीपार्लर चालकांनी असोसिएशनचे सदस्य व्हावे- सौ.कांबळे

  


लोकनेता  न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)

 

अ.नगर-महाराष्ट्र बारा बलुतेदार महासंघ व महाराष्ट्र नाभिक महामंडळशी संलग्न असलेल्या अहमदनगर जिल्हा  ब्युटीपार्लर असोसिएशनचा विस्तार या सप्टेंबर महिन्यात  करण्यात येणार असून त्यासाठी जिल्ह्यातील ज्या महिला ब्युटीपार्लर आहेत त्यांच्या चालकांना आवाहन करण्यात येत आहे कि त्यांनी असो सदस्य व्हावे असे आवाहन  जिल्हाध्यक्ष सौ.अनुजा कांबळे यांनी केले आहे .

           अनुजा कांबळे म्हणाल्या  लॉकडाऊनमुळे ब्युटीपार्लर व्यवसाय संकटात सापडला आहे अनेक ब्युटिशियन आर्थिक संकटात सापडल्या कारण त्या संघटित नव्हत्या जिल्ह्यात संघटना नव्हती त्यामुळे त्याचे प्रश्न  सरकार दरबारी मांडले गेले नाही संघटना झाल्याने त्याचे प्रश्न आता त्या मांडू शकतील नगर जिल्ह्यातील ब्युटिशियन,ब्युटी पार्लर चालक या संघटनेत सहभागी होऊ शकतील  लवकरच जिल्हा कार्यकारणी तसेच तालुका व शहर स्तरावर कार्यकारणी जाहीर करण्यात येणार आहे संघटनेचे सभासद नोंदणी सुरु करण्यात आली आहे.

              शासनाने ज्याप्रमाणे असंघटित क्षेत्राला  अनुदान दिले त्याप्रमाणे ब्युटिशियनला दयावे किंवा सध्या व्यवसाय अडचणीत आहे अनेक  महिन्याचे जागेचे भाडे व काम नसल्याने झालेले नुकसान यासाठी बिनव्याजी कर्ज द्यावे तशी मागणी सरकारकडे ब्युटीपार्लर चालकांच्या नावांनीही करण्यात येणार आहे .

तरी या क्षेत्रातीतील सर्व व्यायासिकांनी व्हाट्सअप ९८५०२६२५९५ वर आपली माहिती पाठवावी त्यांना सदस्य करून घेण्यात येईल तसेच ज्या   ब्युटिशियन संघटनेत पदधिकारी म्हणून काम करण्यास इच्छुक आहे त्यांनी हि संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे तसेच संघटनेच्या वतीने अनेक उपक्रम राबविण्यात येणार आहेत. 

 

      

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या