Ticker

6/Breaking/ticker-posts

नांदेडच्या न्यायालयात विविध पदांची भरती; १५ सप्टेंबर पर्यंत करा अर्ज

 


लोकनेता  न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)

 

नांदेड : नांदेडच्या न्यायालयात विविध पदांच्या भरतीसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. याचा सविस्तर तपशील अधिकृत वेबसाइटवरील नोटिफिकेशनमध्ये देण्यात आला आहे. या भरतीअंतर्गत नांदेडच्या न्यायालयात सहाय्यक सरकारी अभियोक्ता पदांची भरती केली जाणार आहे. नांदेड न्यायालयाच्या प्रशासकीय विभागात विशेष सहाय्यक सरकारी वकील पदांच्या एकूण २९ जागा भरण्यात येणार आहेत.

पात्रता निकष
यासाठी उमेदवार कायद्याचा पदवीधर असणे आवश्यक आहे. खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी ३८ वर्षे वयोमर्यादा ठेवण्यात आली आहे. तर आरक्षित वर्गासाठी यामध्ये शिथिलता देण्यात आली असून ४३ वर्षे वयोमर्यादा ठेवण्यात आली आहे. उमेदवार महाराष्ट्र बार काऊन्सिलकडे नोंदणीकृत असावा. उमेदवाराने पाच वर्षे वकिली व्यवसाय केलेला असावा. त्याला मराठी आणि इंग्रजी भाषेचे ज्ञान असणे गरजेचे आहे.

पदाचा तपशील
निवड झालेल्या उमेदवाराला न्यायालयाच्या आवश्यकतेनुसार जिल्ह्यातील कोणत्याही तालुक्याच्या न्यायालयात काम करणे बंधनकारक राहील. ही नियुक्ती तात्पुरत्या स्वरुपाची असल्याने प्रतिनियुक्तीवर इतर न्यायालयात पाठवले जाणार नाही. काम समाधानकार न वाटल्यास कोणतीही पुर्वसूचना न देता कामाचे वाटप बंद करुन पॅनलवरुन कमी करण्याची शिफारस जिल्हाधिकाऱ्यांकडे केली जाऊ शकते.

शेवटची तारीख
१५ सप्टेंबर ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून दिलेल्या नमुन्यानुसार अर्ज मागविण्यात आले आहेत. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचून त्यानंतर अर्ज करायचा आहे. अर्जामध्ये काही चूक आढळल्यास अर्ज बाद करण्यात येईल. तसेच १५ सप्टेंबरनंतर आलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही.

उमेदवारांनी सहाय्यक संचालक व सरकारी अभियोक्ता कार्यालय, पोलीस अधीक्षक कार्यालयाजवळ, वजिराबाद, नांदेड या पत्त्यावर आपला अर्ज पाठवायचा आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या