लोकनेता न्यूज
(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)
दुसऱ्या डावात कर्णधार रुटचे शानदार शतक
इंग्लंडने कर्णधार जो रुटच्या शतकाच्या बळावर दुसऱ्या डावात
आव्हानात्मक धावसंख्या उभारली. तिसऱ्या दिवसअखेर बिनबाद 25 धावांवरून
पुढे खेळणाऱ्या इंग्लंडचा डाव चौथ्या दिवशी 303 धावांवर
संपुष्टात आला. इंग्लंडकडून जो रुटने 109 धावा केल्या. जो
रुटला जॉनी बेअरस्टोने 30 आणि त्यानंतर सॅम करनने 32
धावा करत चांगली साथ दिली. भारताकडून पहिल्या डाव चार विकेट्स
घेणाऱ्या बुमराहने दुसऱ्या डावात 5 विकेट्स घेतल्या तर
मोहम्मद सिराज आणि शार्दुल ठाकूरने प्रत्येकी 2 विकेट
घेतल्या.
पहिल्या डावात लोकेश राहुलची चांगली खेळी
पहिल्या डावात इंग्लंडला भारताने 183 धावांवर
गुंडाळले होते. कर्णधार रुटच्या अर्धशतकाशिवाय कुणीही मोठी खेळी करु शकलं नाही.
भारताचे वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी,
शार्दुल ठाकूरच्या वेगवान गोलंदाजांसमोर इंग्लंडचा संघ 183 धावांवर आटोपला. इंग्लंडचा डाव 183 धावांवर
गुंडाळल्यानंतर भारताकडून रोहित शर्मा आणि लोकेश राहुल यांनी 97 धावांची दमदार सलामी दिली होती. मात्र त्यानंतर राहुल आणि जाडेजा वगळता
टीम इंडियाकडूनही कुणाला मोठी खेळी करता आली नाही. जाडेजाने ८ चौकार आणि एका
षटकाराची आतषबाजी खेळी केली. त्यानंतर आलेल्या जसप्रीत बुमराहने फटकेबाजी करत 28
धावा केल्या. त्यामुळं भारताचा
पहिला डाव 278 धावांवर गुंडाळला. भारताकडून राहुलनं 84,
जाडेजानं 56 धावा केल्या. इंग्लंडकडून पहिल्या
डावात रॉबिन्सननं 5 तर अॅंडरसननं 4 विकेट्स
घेतल्या.
0 टिप्पण्या