Ticker

6/Breaking/ticker-posts

शर्लिन चोप्राच्या हाती आता राज कुंद्राच्या जामिनाचे भवितव्य ?

 

*राज कुंद्राच्या जामिन अर्जावर आज न्यायालयात सुनावणी होणार

*शर्लिन चोप्राच्या जबानीमुळे राज कुंद्राच्या अडचणींमध्ये वाढ

*शर्लिनच्या जबानीमुळे राजचा जामिन अर्ज फेटाळला जाण्याची शक्यता








लोकनेता  न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)

 

मुंबई : अश्लिल व्हिडिओ तयार करणे आणि ते इंटरनेटवर अॅपच्या माध्यमातून अपलोड केल्या प्रकरणी अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा नवरा आणि उद्योगपती राज कुंद्रा याला १९ जुलै रोजी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने अटक केली. त्यानंतर राज हा २७ जुलैपर्यंत पोलीस कोठडीत होता. राजने जामिन मिळवण्यासाठी न्यायालयात अर्ज दाखल केला होता. परंतु किला कोर्टाने त्याचा जामिन फेटाळून लावत १४ दिवसांच्या न्यायालयीन कोठडी सुनावली होती. त्यानंतर राजने पुन्हा एकदा जामिनासाठी अर्ज दाखल केला. मात्र आजही त्याच्या जामिनावरील सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे.

पोलिसांच्या उत्तरावर दिला जाणार निकाल?


राज कुंद्राच्या जामिन अर्जावर न्यायालयाने मुंबई पोलिसांकडून उत्तर मागवले आहे. या प्रकरणी पोलीस जे उत्तर देतील त्यावर राजच्या जामिन अर्जावरील निकाल लागणार असल्याचं अनेकांचं म्हणणं होतं. पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार क्राईम ब्रँचच्या वकिलांनी राज कुंद्राच्या जामिनाला विरोध केला. या सगळ्यात शर्लिन चोप्राने पोलिसांना जो जबाब दिला त्यामुळे राजचा जामिन फेटाळला जाऊ शकतो असं अनेकांचं म्हणणं आहे. पण यावेळी जामिनावरची सुनावणी पुढे ढकलण्यात आली असून आता २० ऑगस्टपर्यंत राजला पोलीस कोठडीत रहायचे आहे.

राज कुंद्राने जामिन मिळावा,यासाठी २८ जुलै रोजी अर्ज केला होता. परंतु त्याचा जामिन अर्ज न्यायालयाने फेटाळून लावला. पोलिसांनी न्यायालयात सांगितले की, राज कुंद्राच्या विरोधात केवळ साक्षीदार नाही तर सबळ पुरावे देखील आहेत. राज कुंद्राच्या कार्यालयात घातलेल्या छाप्या दरम्यान ६८ अॅडल्ट व्हिडिओ पोलिसांनी जप्त केले आहेत. राजला जर जामिन दिला तर तो साक्षीदार आणि पुरावे नष्ट करू शकतो, त्यामुळे त्याला जामिन दिला जाऊ नये, अशी मागणी पोलिसांनी केली. पोलिसांनी केलेल्या या युक्तीवादामुळे न्यायालयाने राज कुंद्राचा जामिन अर्ज फेटाळून लावला.

शार्लिन चोप्राची जबाब महत्त्वाचा

राज कुंद्रा प्रकरणामध्ये शर्लिन चोप्राने नोंदवलेला जबाब महत्त्वाचा मानला जात आहे. तिने दिलेल्या साक्षीमुळे या प्रकरणाला वेगळे वळण लागू शकते. शर्लिनने राजला अटक होण्याआधी एप्रिल महिन्यात त्याच्याविरोधात लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी तक्रार दाखल केली होती. मुंबई पोलिसांनी राज कुंद्राप्रकरणी शर्लिनची सलग आठ तास चौकशी केली. त्यावेळी शर्लिनने राज आणि त्याच्या कंपनीसोबत असलेल्या संबंधांची माहिती दिली. राज कुंद्रासोबत व्हॉटसअॅप चॅटवर झालेले संभाषण आणि कराराची कॉपीही तिने पोलिसांना दिली.

राज- शर्लिनमध्ये झाला होता वाद

शर्लिन चोप्राने पोलिसांना दिलेल्या जबाबामध्ये राज कुंद्रासोबत बिझनेस डिल करताना वाद झाल्याचे सांगितले होते. तिने पुढे असेही सांगितले की, त्यानंतर राज तिच्या घरी आला आणि तिचे जबरदस्ती चुंबन घेतले. शर्लिनने त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला परंतु अचानक झालेल्या या प्रकरामुळे ती घाबरली होती.

या कलमांखाली राजला झाली अटक

राज कुंद्राच्या विरोधात आयपीसी कलम २९२, २९६ अश्लिल व्हिडिओ बनवणे, विकणे, कलम ४२० लोकांचा विश्वासघात करणे,सूचना प्रौद्योगिकी अधिनियम अंतर्गंत कलम ६७, ६७ अ, अश्लिल व्हिडिओ चित्रीत करणे आणि ते ऑनलाइन शेअर करणे, सामग्री करणे आणि प्रसारित करणे, कलम २ जी, , , ,७ महिलांवर अश्लिल फिल्म बनवणे, ते विकणे आणि प्रसारित करणे या कलमांतर्गंत अटक झाली आहे.

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या