Ticker

6/Breaking/ticker-posts

नाहीतर ईडी लावणार; मुख्यमंत्र्यांचे स्वीय सहाय्यक मिलिंद नार्वेकर यांना धमकी

 

*आपल्या मागण्या पूर्ण न केल्यास ईडी, एनआयए आणि सीबीआयची चौकशी करायला लावू

*अज्ञात व्यक्तीकडून व्हॉट्सअपवर धमकी

*नार्वेकर यांनी केली मुंबई पोलिस आयुक्तांकडे तक्रार.
लोकनेता  न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)

 

मुंबई: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे स्वीय्य सहाय्यक आणि शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर यांना एका अज्ञात व्यक्तीकडून व्हॉट्सअपवर धमकी आल्याने खळबळ उडाली आहे.

या अज्ञात व्यक्तीने मिलिंद नार्वेकर यांच्याकडे काही मागण्या केल्या असून त्या पूर्ण न केल्यास त्यांच्या मागे ईडी, एनआयए आणि सीबीआयची चौकशी करायला लावू अशी धमकी या अज्ञात व्यक्तीने दिली आहे.

या अज्ञात व्यक्तीने मिलिंद नार्वेकर यांच्याकडे नेमक्या कोणत्या मागण्या केल्या याचा तपशील उपलब्ध होऊ शकला नाही. मात्र, या अज्ञात व्यक्तीने केलेल्या मागण्या नार्वेकर यांनी पूर्ण न केल्यास मिलिंद नार्वेकर यांच्यामागे चौकशी लावण्याची धमकी या अज्ञात व्यक्तीने दिली आहे. मिलिंद नार्वेकर यांनी या अज्ञात व्यक्तीविरोधात मुंबईच्या पोलिस आयुक्तांकडे तक्रार दाखल केली आहे. एबीपी माझा या वृत्तवाहिनीने हे वृत्त दिले आहे. नार्वेकराना धमकी देणाऱ्या या अज्ञात व्यक्तीचा शोध पोलिस घेत आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या