Ticker

6/Breaking/ticker-posts

SSC Result 2021: दहावीचा ‘रेकॉर्डब्रेक’ निकाल जाहीर; ९९.९५ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण

 

*राज्य मंडळाचा दहावीचा निकाल जाहीर

*अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे विद्यार्थ्यांना गुण

*result.mh-ssc.ac.in या लिंकवर निकाल उपलब्ध



लोकनेता  न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क) 

मुंबई- SSC Result 2021: महाराष्ट्र बोर्डाचा इयत्ता दहावीचा निकाल (Class x Result) जाहीर झाला आहे. एकूण ९९.९५ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यंदा करोना महामारीच्या दुसऱ्या लाटेमुळे दहावीची परीक्षा रद्द करण्यात आली होती. राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या इतिहासात प्रथमच अशा पद्धतीने परीक्षा अशा पद्धतीने परीक्षा रद्द करण्याची वेळ आली. विद्यार्थ्यांचे दहावीचे मूल्यांकन त्यांच्या अंतर्गत मूल्यमापन अधिक नववीचा वार्षिक परीक्षेचा निकाल या आधारे करण्यात आले आणि निकाल जाहीर करण्यात आला.


दृष्टिक्षेपात निकाल -

परीक्षेला नोंदणी केलेले एकूण विद्यार्थी - १६ लाख ५८ हजार ६२४
एकूण उत्तीर्ण विद्यार्थ्यांची टक्केवारी - ९९.९५ टक्के

निकालाची वैशिष्ट्ये -

* कोकण विभाग अव्वल, १०० टक्के निकाल
* ९५७ विद्यार्थ्यांना १०० टक्के गुण
*नागपूरचा निकाल सर्वात कमी
* यंदाही मुलींचीच बाजी
* राज्यात केवळ ३६८ विद्यार्थ्यांना एटीकेटी

विभागनिहाय टक्केवारी
कोकण - १०० टक्के
पुणे- ९९.९६ टक्के
नागपूर - ९९.८४ टक्के
औरंगाबाद - ९९.९६ टक्के
मुंबई- ९९.९६ टक्के
कोल्हापूर -९९.९२ टक्के
अमरावती - ९९.९८ टक्के
नाशिक - ९९.९६ टक्के
लातूर - ९९.९६ टक्के

पुढील थेट लिंकवर निकाल उपलब्ध -

http://result.mh-ssc.ac.in

www.mahahsscboard.in

श्रेणीसुधार योजनेंतर्गत नोंदणीकृत विद्यार्थ्यांचा निकाल नाही

ज्या विद्यार्थ्यांनी २०२१-२२ या वर्षीच्या परीक्षेसाठी श्रेणीसुधार योजनेंतर्गत नोंदणी केली होती, त्या विद्यार्थ्यांचा निकाल तयार करण्यात आलेला नाही, असे मंडळाने कळवले आहे. या विद्यार्थ्यांसाठी असलेल्या दोन संधींमध्ये या परीक्षेची गणना करण्यात येणार नसल्याने या विद्यार्थ्यांना पुढील एक/दोन संधी उपलब्ध राहतील, असे मंडळाने स्पष्ट केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या