Ticker

6/Breaking/ticker-posts

Hsc result: बारावीचा निकाल कधी ? बोर्डाने सुरू तयारी ; ३१ जुलैचा मुहूर्त ?

 








लोकनेता  न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)

 

मुंबई : राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा इयत्ता बारावी परीक्षेचा निकाल कधी लागणार हे आता जवळपास स्पष्ट झाले आहे. राज्यातील लाखो विद्यार्थी या निकालाची आतुरतेने वाट पाहत आहेत. 

मंडळातर्फे विद्यार्थ्यांना त्यांचे बैठक क्रमांक seet Numbar पाहून ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. यंदा बारावीची परीक्षा रद्द झाली होती, त्यामुळे विद्यार्थ्यांना परीक्षेआधी मिळालेल्या सीट नंबरनुसारच निकाल पाहता येणार आहे. या बैठक क्रमांकांसंदर्भात मंडळाने एक परिपत्रक गुरुवारी २९ जुलै रोजी सायंकाळी जारी केले आहे.

 या हालचाली पाहता बोर्डाची बारावीच्या निकालाची तारीख ३० जुलै रोजी जाहीर होण्याची दाट शक्यता आहे. निकाल ३१ जुलैला जाहीर केला जाऊ शकतो. अर्थात बोर्डाने अद्याप याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही.

बोर्डाने जारी केलेल्या पत्रकात असे म्हटले आहे की, 'कोविड-१९ मुळे उद्भवलेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर बारावीची परीक्षा रद्द करण्यात आली होती. तत्पूर्वी या परीक्षेला नोंदणी केलेल्या सर्व विद्यार्थ्यांना ३ एप्रिल २०२१ रोजी ऑनलाइन प्रवेशपत्र देण्यात आली आहेत. त्यानुसार सर्व उच्च माध्यमिक शाळांनी वा कनिष्ठ महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांना त्यांचे बैठक क्रमांक अवगत करून दिले आहेत. 

मात्र तरी विद्यार्थ्यांना त्यांचे बैठक क्रमांक उपलब्ध झाले नसल्यास त्यांनी मंडळाच्या https://mh-hsc.ac.in या संकेतस्थळावर ही बैठक क्रमांकाविषयीची माहिती उपलब्ध करून दिलेली आहे. मंडळाच्या संकेतस्थळावर दिलेल्या सूचनेनुसार कार्यवाही करून विद्यार्थ्यांनी आपले बैठक क्रमांक उपलब्ध करून द्यावेत.'

विद्यार्थ्यांना त्यांचे सीट नंबर पाहून ठेवण्याच्या सूचना बोर्डाकडून आल्याने निकाल लवकरच जाहीर केला जाणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळाले आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांनुसार राज्यांना जुलै अखेरपर्यंत निकाल जाहीर करावयाचे आहेत. म्हणजेच राज्य मंडळाने शुक्रवारी ३० जुलै रोजी निकालाची तारीख जाहीर केल्यास ३१ जुलैला निकाल जाहीर होण्याची दाट शक्यता आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या