Ticker

6/Breaking/ticker-posts

कृपाशंकर सिंह यांचा भाजप प्रवेश; BMCतील गणितं बदलणार?

  *मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष कृपाशंकर सिंह भाजपच्या गळाला.

·      *देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आज भाजपात प्रवेश करणार.




लोकनेता  न्यूज

(  ऑनलाईन न्यूज नेटवर्क  )

·        मुंबई: माजी गृहराज्यमंत्री, मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष कृपाशंकर सिंह यांनी आज भाजपात प्रवेश झाला आहे. उद्या विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत कृपाशंकर हे भाजपात जाहीर प्रवेश करणार असून आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही खूप मोठी घडामोड मानली जात आहे.


मुंबईत प्रदेश भाजप कार्यालयात उद्या (७ जुलै) दुपारी १२ वाजता होणाऱ्या एका छोटेखानी कार्यक्रमात कृपाशंकर यांच्यासोबतच त्यांचे काही कार्यकर्ते तसेच नाशिकमधील निफाड येथील युवा नेते यतीन कदम हे भाजपमध्ये प्रवेश करत आहेत, असे भाजपमधील सूत्रांकडून सांगण्यात आले. यतीन कदम हे दिवंगत आमदार रावसाहेब कदम यांचे पुत्र आहेत. मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कृपाशंकर सिंह यांच्या रूपाने उत्तर भारतीयांचा मुंबईतील एक प्रमुख नेता भाजपमध्ये प्रवेश करत असल्याने बरीच गणितं बदलण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.


कृपाशंकर सिंह यांना राज्यातील काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांमध्ये स्थान राहिले आहे. मुंबईतील कालिना विधानसभा मतदारसंघातून तीनवेळा ते काँग्रेसच्या तिकिटावर निवडून आले आहेत. विलासराव देशमुख यांच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये सिंह हे गृहराज्यमंत्री होते. मुंबई काँग्रेसचं अध्यक्षपदही त्यांनी सांभाळलेलं आहे. मात्र, जम्मू-काश्मीरमधून कलम ३७० हटवण्याच्या मोदी सरकारच्या निर्णयावर काँग्रेसने जी भूमिका घेतली त्यावर कृपाशंकर यांनी आक्षेप घेतला होता. त्याचवेळी निषेध म्हणून त्यांनी सोनिया गांधी यांच्याकडे आपला राजीनामा सोपवला होता. २०१९ मध्ये काँग्रेसला रामराम ठोकल्यानंतर गेले २० महिने कृपाशंकर हे सक्रिय राजकारणात नव्हते. या दरम्यान त्यांची भाजपशी मात्र जवळीक वाढली होती. त्यातूनच भाजपने मुंबई महापालिका डोळ्यासमोर ठेवत कृपाशंकर यांच्यासाठी पक्षाचे दार खुले केल्याचे बोलले जात आहे.

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या