Ticker

6/Breaking/ticker-posts

नगरसेविका मीनाताई चोपडा यांचा ‘करोना योध्दा’ सन्मानाने ग़ौरव

 लोकनेता  न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)

अ.नगर : करोना काळात लोकप्रतिनिधी म्हणून सर्वोच्च योगदान देत सर्वसामान्यांना दिलासा देण्याचे काम केल्याबद्दल नगरसेविका मीनाताई संजय चोपडा यांना करोना योध्दा सन्मान प्रदान करण्यात आला. शहराच्या विकासाचे ध्येय समोर ठेवून कार्यरत असलेल्या आय लव्ह नगर संघटनेच्यावतीने हा चोपडा यांचा हा सन्मान करण्यात आला आहे.

नगरसेविका मीनाताई चोपडा या प्रभागातील विविध समस्यांच्या सोडवणुकीसाठी तत्पर असतात. नागरिकांचे महानगरपालिकेशी संबंधित विविध प्रश्न सोडविण्यासाठी त्या सातत्याने पाठपुरावा करतात. यासाठी त्यांना आ.संग्राम जगताप यांचे मोलाचे मार्गदर्शन व सहकार्य लाभत असते. करोनाच्या संकट काळात त्यांनी सर्वसामान्यांना दिलासा देण्याचे मोठे काम केले. करोनाच्या पहिल्या लाटेवेळी भारतीय जैन संघटनेचे आदेश चंगेडिया यांच्या सहकार्यातून नगर शहरात फिरता दवाखाना सुरू करून रूग्णांचा शोध घेण्यासाठी त्यांनी विशेष प्रयत्न केले. करोनाचा कहर सुरु असताना अँटीजेन, आरटीपीसीआर चाचणी केंद्रांची व्यवस्था, रूग्णांचे विलीगीकरण, त्यांना बेड मिळवून देणे याकामीही त्यांनी योगदान दिले.

करोना लसीकरणात सुसूत्रता आणून जास्तीत जास्त लोकांचे लसीकरण कसे होईल यादृष्टीने त्यांनी विशेष प्रयत्न केले. यात साधूसाध्वीजींच्या लसीकरणाचीही विशेष व्यवस्था करण्यात त्यांना यश आले. त्यांच्या याच कार्याची दखल घेत आय लव्ह नगरने त्यांना करोना योध्दा पुरस्काराने सन्मानित केले आहे. या सन्मानाबद्दल त्यांचे आ.संग्राम जगताप, उपमहापौर गणेश भोसले आदींनी अभिनंदन केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या