Ticker

6/Breaking/ticker-posts

मुख्यमंत्र्यांच्या वाढदिसानिमित्त शिवसेनेच्यावतीने पाथर्डी उपजिल्हा रुग्णालयात मास्क ,फळे वाटप

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिसानिमित्त शिवसेना शहरप्रमुख सागर राठोड यांचा उपक्रम
लोकनेता  न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)पाथर्डी : राज्याचे  लोकप्रिय मुख्यमंत्री  उध्दव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त पाथर्डी शहर शिवसेनेच्यावतीने   शहरप्रमुख सागर राठोड यांनी  शिवसैनिकांसह   येथील उपजिल्हा रुग्णालयात जाऊन कोविड सेंटरमधील रुग्णांना मास्क,फळे आदी वस्तूंचे वाटप केले.

  मुख्यमंत्र्यांच्या वाढिवसानिमित्त  सहसंपर्क प्रमुख डॉ विजय पाटील यांच्या आदेशाने व जिल्हा प्रमुख राजाभाऊ दळवी यांच्या मार्गदर्शनाखाली उपजिल्हा रुग्णालय पाथर्डी शहर येथे कोविड सेंटरला मास्क व फळ वाटप करण्यात आले कार्यक्रमच नियोजन शहर प्रमुख सागर राठोड यांनी केले. 

 कोरोना संकट असताना महाराष्ट्रात झालेल्या अतीवृष्ठीने कोकणात हाहाकार उडाला आहे. अश्या संकटात राज्यातील  गरजूंना मदत करा. कोव्हिड सेंटर पूरग्रस्त भागांना मदत करा असे आवाहन करण्यात आले. यावेळी पाथर्डी शहराचे शहर प्रमुख सागर राठोड यांच्यासह शहर संघटक -संतोष मेघुंडे, तालुका उपप्रमुख -नवनाथ वाघ शाखा प्रमूख- घनशाम घोडक प्रथमेश नाकील, सागर दिनकर, आदी शिवसैनिक उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या