*21 आणि 22 जुलै रोजी रायगड, रत्नागिरी, पुणे, सातारा आणि कोल्हापूरला रेड अलर्ट
लोकनेता न्यूज
(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)
मुंबई : बंगालच्या
उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार होत असल्याने 21 आणि 22
जुलै रोजी महाराष्ट्रात सर्वत्र पावसाचा अंदाज देण्यात आला आहे.
कोकणात पावसाचा जोर पुढील पाच दिवस कायम राहणार, मध्य
महाराष्ट्रासह विदर्भातही पुढील 3-4 दिवस पावसाचा अंदाज
हवामान विभागाकडून देण्यात आला आहे.
बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार होत असल्याने चांगल्या
पावसाचा अंदाज देण्यात आले आहे. कोकण पट्ट्यावर आणि मध्य महाराष्ट्रावर ढगांची
दाटी कायम, त्यामुळे ठाणे, रायगड,
पालघर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग
आणि सातारा, पुणे आणि कोल्हापूरातील घाट माथ्यावर मुसळधार
पावसाची शक्यता तर काही ठिकाणी मध्यम स्वरुपाचा पाऊस अपेक्षित आहे. 21 आणि 22 जुलै रोजी महाराष्ट्रात सर्वत्र चांगला पाऊस
अपेक्षित, बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार होत
असल्याने पावसाचा अंदाज व्यक्त करत आहे.
21 आणि 22 जुलै
रोजी रायगड, रत्नागिरी, पुणे, सातारा आणि कोल्हापूरला रेड अलर्ट, प्रामुख्याने
पुणे, साताऱ्यातील घाट परिसरात अतिवृष्टीची शक्यता आहे.
मुंबई उपनगरांमध्ये देखील चांगल्या पावसाचा अंदाज, उद्यासाठी
मुंबई, ठाण्याला आॅरेंज अलर्ट तर 22 जुलै
रोजी रेड अलर्ट, ज्यात सर्वत्र पावसाचा अंदाज तर काही ठिकाणी
अतिमुसळधार पावसाची शक्यता, नाशिक जिल्ह्यातही 22 जुलै रोजी सर्वत्र पावसाचा अंदाज देण्यात आला. विदर्भात पुढील 3-4
दिवस सर्वत्र पाऊस, 21 आणि 22 तारखेला अनेक जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता आहे. मराठवाड्यात देखील
पाऊस राहणार, काही ठिकाणी मुसळधार तर अनेक ठिकाणी मध्यम
स्वरुपाचा पाऊस असणार आहे.
0 टिप्पण्या