Ticker

6/Breaking/ticker-posts

राष्ट्रवादीत संघर्ष करणार्याला न्याय मिळतो; काका तुमचा संघर्ष वाया जाणार नाही- आ. पवार

 *अॅड. प्रताप ढाकणे यांच्या अभिष्टचिंतन सोहळात आमदार रोहित पवार यांच्याकडून कौतुक







लोकनेता  न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)

पाथर्डी : कोरोना काळात अॅड. प्रताप ढाकणेकुटुंबाने  सर्वसामान्यांची कोरोनात काळजी घेतली. राजकारणात पदाला महत्व न देता लोकांसाठी त्यांनी नेहमीच संघर्ष केला. राष्ट्रवादीत जो संघर्ष करतो त्याला न्याय मिळतो येत्या काळात तुमचा संघर्ष वाया जाणार नाही, अशा शब्दांत आमदार रोहित पवार यांनी अँड प्रताप ढाकणे यांच्या कामाची दखल घेत पुढील राजकीय वाटचालीसाठी आश्वस्त केले.

केदारेश्वर कारखान्याचे चेअरमन अॅड. प्रताप ढाकणे यांच्या अभिष्टचिंतन सोहळा निमित्त संस्कार भवन येथे आयोजित कार्यक्रमात पवार बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके होते. यावेळी राष्ट्रवादी चे प्रदेश सरचिटणीस अँड प्रताप ढाकणे,माजी आमदार चंद्रशेखर घुले,जिल्हा परिषद सदस्य प्रभावती ढाकणे,तालुकाध्यक्ष बाळासाहेब ताठे,उद्योजक किरण शेटे,शेवगाव पंचयात समिती सभापती डॉ क्षितिज घुले, काकासाहेब नरवडे, केदारेश्वर कारखान्याचे तज्ञ संचालक ऋषिकेश ढाकणे, सिद्धेश ढाकणे,शिवशंकर राजळे,नगरसेवक बंडू पाटील बोरुडे,कृषी उत्पन्न बाजार समितीचे चेअरमन बन्सी आठरे,संचालक गहिनीनाथ वैभव आंधळे, माजी सभापती संभाजी पालवे,सिताराम बोरुडे,डॉ दीपक देशमुख,डॉ राजेंद्र खेडकर,दिगंबर गाडे,चांद मणियार,योगेश रासने, देवा पवार,अक्रम आतार,हेमंत सुपेकर,सागर शिरसाट,विनय बोरुडे,माऊली केळगंद्रे,बाळासाहेब ढाकणे,शिवाजी बडे,एम पी आव्हाड रामराव चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते.

 यावेळी बोलताना अँड. प्रताप ढाकणे म्हणाले, गेल्या तीन पिढ्यांपासून पवार साहेबांवर आमची निष्ठा आहे. कधीही सत्तेची लालसा धरली नाही. स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्या आग्रहास्तव भाजपात गेलो. मात्र भाजपाचे विचार न पटल्याने सत्ता येणार आहे हे माहीत असतानाही स्वर्गीय मुंडे यांना सांगून बाहेर पडलो. तेव्हा घेतलेला निर्णय आज योग्य वाटतो.  भाजपमध्ये आमच्या भगिनीची अवस्था काय झाली आहे . तशीच माझी  झाली असती. सत्तेसाठी कधीच लाचारी केली नाही. मी कालही आमदार नव्हतो आजही नाही अन उद्याच काही माहित नाही पण जनतेसाठी  कायमचा आमदार आहे. विधानसभेला एक लाख लोकांनी मला मते दिली. त्यांच्यासाठी मला काम केलं पाहिजे. यापुढील काळात आपण थांबणार नाही. प्रत्येक गावात जाऊन लोकांच्या अडीअडचणी सोडवण्याचा प्रयत्न करणार असल्याचे ढाकणे म्हणाले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या